Dhule Lok Sabha Election : लोकसभेच्या धुळे मतदारसंघासाठी भाजपने उमेदवार जाहीर करत सरशी घेतली. मात्र, प्रतिस्पर्धी काँग्रेसची उमेदवार निवडीत दमछाक होत असल्याचे चित्र आहे. अशात भाजपमध्ये उमेदवारी न मिळालेले काही इच्छुक काँग्रेस नेत्यांच्या संपर्कात आहेत. याउलट या पक्षातून निष्ठावंताला उमेदवारी दिली जावी, असा सूर उमटत आहे, तर ‘आयाराम’ला प्राधान्य देऊ नये, अशी काँग्रेस कार्यकर्त्यांची इच्छा आहे. (Dhule Lok Sabha Election candidates who did not get nomination in BJP are in touch with Congress leaders)
धुळे मतदारसंघात भाजप आणि काँग्रेसमधील लढत ही काँग्रेसकडून दिल्या जाणाऱ्या प्रबळ उमेदवारामुळे चुरशी ठरते किंवा कसे हे उमेदवाराचे नाव जाहीर झाल्यानंतर स्पष्ट होणार आहे. भाजपमध्ये विद्यमान खासदार डॉ. सुभाष भामरे यांना तिसऱ्यांदा उमेदवारी दिली गेली आहे. मात्र, प्रतिस्पर्धी काँग्रेसकडून अद्याप उमेदवार जाहीर झाला नसल्याने पक्षीय कार्यकर्त्यांतर्गत संभ्रमावस्था आहे.
इच्छुक ‘नॉट रिचेबल’
भाजपमधील काही नाराज इच्छुक उमेदवारीसाठी काँग्रेस नेत्यांच्या दारात उभे ठाकले आहेत. त्यांना प्रथम काँग्रेस पक्ष प्रवेशाची गळ घातली जात आहे. पक्षप्रवेशानंतर उमेदवारीविषयी चर्चा सुरू केली जाईल, असे काँग्रेस नेते सांगत आहेत. यानंतर भाजपमधील नाराज इच्छुक ‘नॉट रिचेबल’ होत आहेत. (latest marathi news)
असे असताना काँग्रेस कार्यकर्त्यांकडून पक्षातीलच निष्ठावंतांना उमेदवारी दिली जावी, अशी मागणी होताना दिसते आहे. उमेदवारीसाठी ‘आयाराम’पेक्षा पक्षाकडून प्रतिस्पर्धी उमेदवाराला चांगली लढत देऊ शकणाऱ्या कार्यकर्त्याला संधी दिली जावी, अशीही काँग्रेस कार्यकर्त्यांची मागणी होताना दिसते.
नेत्यांचे कसब पणाला
या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेत्यांचे उमेदवार निवडीत कसब पणाला लागत आहे. काँग्रेस पक्षांतर्गत डॉ. तुषार शेवाळे आणि श्यामकांत सनेर प्रबळ दावेदार आहेत. भाजपकडून माजी सनदी अधिकारी प्रताप दिघावकर, डॉ. विलास बच्छाव व अन्य काही पदाधिकारी उमेदवारीसाठी इच्छुक होते. या स्थितीत काँग्रेसचे नेते कुणाच्या गळ्यात नेमकी उमेदवारीची माळ टाकतात याकडे सर्वांचे लक्ष आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.