Dhule Lok Sabha Election : आपणास मतदार चिठ्ठी मिळाली का? जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी धुळ्यात साधला नागरिकांशी संवाद

Lok Sabha Election : धुळे लोकसभा मतदारसंघ निवडणुकीसाठी सोमवारी (ता. २०) मतदान होणार आहे.
Collector Abhinav Goyal while interacting with the voters regarding the voter ticket.
Collector Abhinav Goyal while interacting with the voters regarding the voter ticket.esakal
Updated on

Dhule Lok Sabha Election : आपल्या घरी बीएलओ आले होते का? आपल्याला मतदार चिठ्ठी मिळाली का? त्यावर असलेला बारकोड कसा स्कॅन करावा, कुटुंबातील वयोवृद्ध मतदार मतदान केंद्रापर्यंत कसे जाणार, बाहेरगावी असलेले कुटुंबातील मतदार धुळ्यात कधी येणार आहेत, यासारख्या प्रश्नरूपी संवादाने नागरिकही आश्चर्यचकित झाले होते. याचे कारणही तसेच होते. समोर प्रत्यक्षात होते, जिल्ह्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अभिनव गोयल..! (Collector Abhinav Goyal interacted with citizens in Dhule )

धुळे लोकसभा मतदारसंघ निवडणुकीसाठी सोमवारी (ता. २०) मतदान होणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार लोकसभा निवडणुकीत मतदारांना आपले मतदान कोणत्या मतदान केंद्रावर आहे हे माहीत होण्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत ‘बीएलओं’कडून मतदार चिठ्ठीचे वाटप करण्यात आले आहे.

या मतदार चिठ्ठ्या नागरिकांपर्यंत पोचल्याची खातरजमा करणे, जास्तीत जास्त नागरिकांनी मतदान करावे यासाठी बुधवारी (ता. १५) सायंकाळी जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी देवपूरमधील शिवपार्वती कॉलनी, सत्संग कॉलनी, इंदिरा कॉलनी परिसराला भेट दिली.

दिलखुलास संवाद

भेटीदरम्यान परिसरातील नागरिकांशी संवाद साधत मतदान कर्मचारी तुमच्या घरी आले होते का, तुम्हाला मतदार चिठ्ठी मिळाली का? त्यावर माहिती असलेला बारकोड कसा स्कॅन करावा, वयोवृद्ध नागरिकांशी संवाद साधत मतदान केंद्रापर्यंत कसे जाणार, बाहेरगावी असलेले कुटुंबातील मतदार कधी येणार आहेत का? याबाबत माहिती विचारली. परिसरातील महिला, वयोवृद्ध नागरिकांनीदेखील जिल्हाधिकारी गोयल यांच्याशी दिलखुलास संवाद साधला.

Collector Abhinav Goyal while interacting with the voters regarding the voter ticket.
Dhule Lok Sabha Election : मतदार सुलभता केंद्राची स्थापना; कर्मचाऱ्यांसाठी टपाली मतदान कक्षही सज्ज

नागरिक भारावले

आपल्या कॉलनी परिसरात जिल्हाधिकारी अभिनव गोयल स्वत: येऊन परिसरातील नागरिकांशी संवाद साधत असल्याने नागरिकही भारावले. संवादाची सुरवात शिवपार्वती कॉलनीपासून झाली. या भागातील नागरिकांशी सहज संवादातून त्यांनी निवडणूक प्रक्रिया कितपत समजली आहे याची माहिती करून घेतली. या वेळी त्यांनी मतदार चिठ्ठी ‘बीएलओं’मार्फत घरी पोचली आहे का, हा पहिला प्रश्न केला.

त्यानंतर मतदान केंद्र कुठे आहे, तुमच्या घरात एकूण किती मतदार आहेत, मतदान केंद्रापर्यंत कसे जाणार आहात, काही अडीअडचणी आहेत का याविषयी चौकशी केली. परिसरातील महिलाही या संवादात सहभागी झाल्या. परिसरातील नागरिकांनी जिल्हाधिकारी गोयल यांच्याशी संवाद साधू लागले. परिसरातील नागरिकांनी निवडणूक प्रक्रिया, त्यातील अडीअडचणी, मतदान कमी का होते याबद्दल विविध अनुषंगाने चर्चा केली.

इतरांना प्रेरित करा

जिल्हाधिकारी गोयल यांनी जिल्ह्यातील सर्व सजग नागरिकांनी आपल्यासोबत इतरांनाही मतदानाकरता प्रेरित करावे, असे आवाहन केले. शहरच्या स्वीप नोडल अधिकारी तथा अपर तहसीलदार वैशाली हिंगे, मंडळाधिकारी पंडित दावळे, तलाठी प्रमोद पाडेन, तलाठी सी. डी. पाटील, सेक्टर ऑफिसर श्रीवास्तव, बीएलओ विजय चव्हाण, रवींद्र बोरसे, सुदाम सोनवणे आदी उपस्थित होते.

Collector Abhinav Goyal while interacting with the voters regarding the voter ticket.
Dhule Lok Sabha Election : मतदानाचा हक्क 407 मतदारांनी बजावला; अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी सुविधा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.