Dhule Lok Sabha Election : धुळ्यात मतदानाचा टक्कावाढीसाठी प्रयत्न

Dhule Lok Sabha Election : लोकसभेच्या निवडणुकीत देशाच्या स्वातंत्र्यापासून धुळे शहर विधानसभा मतदारसंघात ५० टक्क्यांहून अधिक मतदान होऊ शकलेले नाही.
Seema Ahire, Vaishali Hinge while giving information at Upper Tehsil Office about instructions for Lok Sabha Elections.
Seema Ahire, Vaishali Hinge while giving information at Upper Tehsil Office about instructions for Lok Sabha Elections.esakal
Updated on

Dhule Lok Sabha Election : लोकसभेच्या निवडणुकीत देशाच्या स्वातंत्र्यापासून धुळे शहर विधानसभा मतदारसंघात ५० टक्क्यांहून अधिक मतदान होऊ शकलेले नाही. किंबहुना, गेल्या निवडणुकीवेळी सरासरी २९ टक्केच मतदान झाले. त्यामुळे होऊ घातलेल्या या निवडणुकीत लोकसहभागासह जनजागृतीतून मतदानाचा टक्कावाढीचे कसोशीने प्रयत्न होतील. (Dhule lok sabha election Efforts to increase percentage of voting in Dhule through public awareness)

शहर मतदारसंघात आचारसंहितेचे पालन, केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार विविध कक्षांसह सेवा कार्यान्वित झाली असून, उपाययोजनांचा चौकसतेने अंमल होण्यासाठी पथकांची नियुक्ती केल्याची माहिती सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी सीमा अहिरे यांनी दिली.

धुळे शहर विधानसभा मतदारसंघातील उपाययोजना आणि सेवांसंदर्भात अपर तहसील कार्यालयात सोमवारी (ता. १८) सायंकाळी पाचला पत्रकार परिषद झाली. तीत भूसंपादन उपजिल्हाधिकारी सीमा अहिरे, अपर तहसीलदार वैशाली हिंगे यांनी लोकसभा निवडणुकीसंदर्भात तयारीची माहिती दिली.

२१ कक्ष कार्यान्वित

लोकसभेच्या धुळे मतदारसंघात पाचव्या टप्प्यात २० मेस निवडणूक होत आहे. या अनुषंगाने निवडणुकीची तयारी सुरू आहे. धुळे शहर विधानसभा मतदारसंघ क्षेत्रात लोकसभा निवडणूक कामकाजासाठी २१ कक्ष कार्यान्वित केले आहेत.

यात १९१ अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांची नियुक्ती आहे. प्रभारी अधिकारी, सहाय्यक अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर झाल्या आहेत. यात जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, कृषी विभाग, महापालिका, सिंचन विभाग, नगरभूमापन अधिकारी कार्यालय, तहसील, अपर तहसील कार्यालयांसह अन्य कार्यालयांतील अधिकारी, कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. (latest marathi news)

Seema Ahire, Vaishali Hinge while giving information at Upper Tehsil Office about instructions for Lok Sabha Elections.
Dhule Lok Sabha Code of Conduct : आचारसंहिता लागू झाल्याने पिशव्यांचा बाजार गुंडाळला

कक्ष प्रभारी हिंगे

मुख्य निवडणूक कक्ष जिल्हाधिकारी कार्यालयात असेल. कक्ष प्रभारी अपर तहसीलदार वैशाली हिंगे असतील. त्यांच्या नियंत्रणाखाली सहा सहाय्यक अधिकारी व कर्मचारी असतील. या कक्षात सहाय्यक निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितलेली माहिती तयार करणे तसेच नोडल अधिकाऱ्यांशी समन्वय ठेवून कामे करून घेण्याची जबाबदारी असेल.

दुसरा कक्ष महापालिकेत असेल. कक्ष प्रभारी मनपा सहाय्यक आयुक्त समीर शेख आहेत. त्यांच्या नियंत्रणाखाली तीन कर्मचारी आहेत. मनपा क्षेत्रातील सर्व मतदान केंद्रांवर किमान सुविधा असल्याची खात्री करण्यासह आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याची कार्यवाही या कक्षातून होणार आहे. १४-१

आचारसंहिता नियंत्रण कक्ष

आचारसंहिता, कायदा व सुव्यवस्थेबाबत संनियंत्रण करण्यासाठी स्वतंत्र आचारसंहिता कक्ष पोलिस नियंत्रण कक्षासह असणार आहे. या कक्षातून कायदा व सुव्यवस्था प्रतिबंधात्मक आदेशाबाबत कार्यवाही, पोलिस बंदोबस्त, आचारसंहिताभंगासंबंधी तक्रारीबाबत पत्रव्यवहार, व्हिडिओ चित्रीकरण करावयाच्या कामाचे नियोजनासह इतर व्यवस्थेची कार्यवाही होणार आहे.

या कक्षात तीन सहाय्यक अधिकारी, नऊ कर्मचाऱ्यांची नियुक्ती झाली आहे. त्याचप्रमाणे वाहतूक व्यवस्थापनासाठी दोन सहाय्यक अधिकारी, पाच कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. नियुक्त काही कक्षांची तात्पुरती व्यवस्था आहे.

Seema Ahire, Vaishali Hinge while giving information at Upper Tehsil Office about instructions for Lok Sabha Elections.
Dhule Lok Sabha Code of Conduct : पदाधिकारी दालनांच्या भिंतींनाही मोकळा श्‍वास!

त्यामुळे एकापेक्षा अधिक कक्षांसाठी एकच अधिकारी, कर्मचाऱ्याची नियुक्ती झाली आहे. हे काम निवडणूक प्रक्रियेशी संबंधित असल्याने कामात दिरंगाई व हयगय केल्याचे आढळल्यास संबंधितांवर तरतुदीनुसार कारवाई करण्यात येईल, असा इशारा उपजिल्हाधिकारी अहिरे यांनी दिला.

नियंत्रण कक्ष चोवीस तास सेवेत

अपर तहसील कार्यालयातील नियंत्रण कक्ष (दूरध्वनी ः ०२५६२-२९८०१६) चोवीस तास सेवेत असेल. आचारसंहितेसंबंधी व इतर तक्रारींचे निराकरण करण्यासाठी शहराच्या चौफेर चार भरारी पथके चोवीस तास कार्यरत असतील. सार्वजनिक मालमत्तेचे विद्रूपीकरण आढळल्यास कारवाई केली जाईल.

त्यामुळे निवडणूक घोषित झाल्यापासून ७२ तासांच्या आत सरकारी, सार्वजनिक वा खासगी मालमत्तेच्या ठिकाणी असलेले पोस्टर, बॅनर वा तत्सम बाबी हटविल्या जाव्यात. निवडणुकीत प्रलोभन, मौलिक आमिष दाखविले जाऊ म्हणून लळिंग टोलनाका, पारोळा रोड चौफुली, नगावबारी चौफुली येथे विशेष तपासणी पथके असतील.

बँकांमधून रोज व्यवहार होणाऱ्या आर्थिक स्थितीची माहिती नोंदवून घेतली जाईल. निवडणुकीच्या संपूर्ण प्रक्रियेत उमेदवार आणि राजकीय पक्षांनी काय करावे आणि काय करू नये याबाबत आयोगाकडील निर्देशांची माहिती संबंधितांना बैठकीतून दिल्याची माहिती उपजिल्हाधिकारी अहिरे, अपर तहसीलदार हिंगे यांनी दिली.

Seema Ahire, Vaishali Hinge while giving information at Upper Tehsil Office about instructions for Lok Sabha Elections.
Dhule Fruits Rate Hike : आवक नसल्याने फळांचे दर वाढले

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.