Dhule Lok Sabha Election : मतदानाची प्रक्रिया सुरळीत पार पाडावी; राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांची सूचना

Lok Sabha Election : राज्यात लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पाचव्या व अखेरच्या टप्प्यासाठी सोमवारी (ता. २०) मतदान होणार आहे.
Attending the meeting regarding preparations for the Lok Sabha elections. Chokkalingam, Abhinav Goyal, Srikanth Dhiware, Vishal Narwade, Nitin Gawande.
Attending the meeting regarding preparations for the Lok Sabha elections. Chokkalingam, Abhinav Goyal, Srikanth Dhiware, Vishal Narwade, Nitin Gawande.esakal
Updated on

Dhule Lok Sabha Election : राज्यात लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पाचव्या व अखेरच्या टप्प्यासाठी सोमवारी (ता. २०) मतदान होणार आहे. या पाचव्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी सर्व समन्वयक अधिकाऱ्यांनी निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार दिलेली जबाबदारी उत्तम प्रकारे पार पाडावी, असे निर्देश प्रधान सचिव व राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी दिले. ( Election Officer Should conduct voting process smoothly Chockalingam suggestion )

जिल्हाधिकारी कार्यालयातील सातपुडा सभागृहात निवडणूकविषयक आढावा बैठक झाली. श्री. चोक्कलिंगम, जिल्हाधिकारी अभिनव गोयल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलिस अधीक्षक किशोर काळे, निवासी उपजिल्हाधिकारी नितीन गावंडे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी गंगाराम तळपाडे आदी उपस्थित होते.

यंत्रणेला सूचना

श्री. चोक्कलिंगम म्हणाले, की येत्या सोमवारी राज्यात पाचव्या टप्प्यासाठी मतदान होणार असून, मतदारांना मतदान केंद्रांवर आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. यात प्रत्येक मतदान केंद्रावर मतदारांसाठी पिण्याचे पाणी, दिव्यांग व ज्येष्ठ मतदारांसाठी रॅम्पची व्यवस्था, मतदारांसाठी शेड, मेडिकल किट, मतदार सहाय्यता केंद्राची व्यवस्था करावी. मतदारांना सुलभपणे मतदान करता यावे यासाठी मतदार चिठ्ठी, मतदार मार्गदर्शिका पुस्तिका तसेच अंध दिव्यांगांसाठी ब्रेललिपी वोटर स्लिप मतदारांपर्यंत वेळेत पोचतील याची दक्षता घ्यावी.

प्रसंगी गर्दी टाळावी

उन्हाची तीव्रता तसेच पावसाचे सावट या पार्श्वभूमीवर मतदान केंद्रावर आवश्यक उपाययोजना कराव्यात. निवडणूक आयोगामार्फत प्राप्त झालेल्या इपीक कार्डाचे वितरण झाल्याची खात्री करावी. एकाच ठिकाणी अधिक मतदान केंद्रे असतील तेथे गर्दी टाळण्यासाठी मतदारांना बसण्यासाठी वेटिंग रूमची व्यवस्था करावी. सूक्ष्म निरीक्षकांना विविध अहवाल देण्यासाठी प्रशिक्षण देण्यात यावे.

Attending the meeting regarding preparations for the Lok Sabha elections. Chokkalingam, Abhinav Goyal, Srikanth Dhiware, Vishal Narwade, Nitin Gawande.
Dhule Lok Sabha Election : ज्येष्ठ, दिव्यांग मतदारांच्या गृहभेटींचे वेळापत्रक जाहीर; धुळे लोकसभा मतदारसंघ निवडणूक

मतदानाची आकडेवारी दर दोन तासांनी अचूक देण्यात यावी. आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन झाल्यास त्वरित कार्यवाही करावी. उमेदवारांच्या खर्चावर काटेकोरपणे लक्ष ठेवावे, मतदानाच्या काळात सोशल मीडियावर प्रसारित होणारे, गैरसमज पसरविणारे संदेश व इतर घटनांवर लक्ष ठेवून अशा घटनांचे त्वरित खंडन करावे.

मोबाईलबाबत दक्षता

कुठेही कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होणार नाही यासाठी विशेष दक्षता घ्यावी. चेकपोस्टच्या ठिकाणी वाहनांची तपासणी काटेकोरपणे करावी, ईव्हीएम मशिन संदर्भात नागरिकांमध्ये जनजागृती करावी. नागरिकांना मतदार यादीतील नाव शोधण्याबाबत माहिती देऊन त्यांना मतदानासाठी प्रोत्साहित करावे. मनुष्यबळाचे योग्य नियोजन करून आवश्यकतेप्रमाणे राखीव मनुष्यबळ वापरावे. ईव्हीएम मशिन हाताळताना काळजी घ्यावी.

मतदान केंद्राच्या शंभर मीटर परिसरात मतदारांना मोबाईल फोन वापरण्यास प्रतिबंध असल्याने त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी. मतदानासाठी मतदारांवर कुठलाही दबाव येणार नाही तसेच त्यांना कोणतेही आमिष दाखविले जाणार नाही याची दक्षता घेऊन निवडणूक निर्भय व निरपेक्ष पार पडण्यासाठी सर्व यंत्रणांनी सतर्क राहावे, असे श्री. चोक्कलिंगम यांनी सांगितले.

पाळणाघराची व्यवस्था

श्री. गोयल म्हणाले, की साक्री व शिरपूर विधानसभा क्षेत्रात मतदान प्रक्रिया पूर्ण झाली असूनही संबंधित क्षेत्रात एसएसटी पक्षक कार्यान्वित करण्यात आले आहे. मतदान केंद्रावर आवश्यकतेनुसार दिव्यांगांसाठी व्हीलचेअर उपलब्ध करून देण्यात आले आहे. प्रत्येक मतदान केंद्रावर पाळणाघराची व्यवस्था करण्यात आली आहे. जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदारसंघांत मतदारांना व्होटर स्लिप तसेच मतदान मार्गदर्शिका पुस्तिकेचे वाटप करण्यात आले आहे.

Attending the meeting regarding preparations for the Lok Sabha elections. Chokkalingam, Abhinav Goyal, Srikanth Dhiware, Vishal Narwade, Nitin Gawande.
Dhule Lok Sabha Election : ज्येष्ठ, दिव्यांग मतदारांच्या गृहभेटींचे वेळापत्रक जाहीर; धुळे लोकसभा मतदारसंघ निवडणूक

पूर्वतयारीची माहिती

मुख्य कार्यकारी अधिकारी नरवाडे यांनी मतदार जनजागृतींतर्गत (स्वीप)अंतर्गत उपक्रमांची माहिती दिली. गृहभेटी उपक्रमांतर्गत जिल्हा परिषदेच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांमार्फत जिल्ह्यातील प्रत्येक कुटुंबापर्यंत पोचून मतदान करण्याबाबत आवाहन करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्हा पोलिस अधीक्षक धिवरे यांनी पोलिस विभागाने केलेल्या तयारीची माहिती दिली.

यामध्ये कायदा व सुव्यवस्था, चेक पोस्टवरील बंदोबस्त, मनुष्यबळाची उपलब्धता, प्रतिबंधात्मक कारवाई आदींबाबत माहिती देऊन निवडणुका शांततेत पार पाडण्यासाठी सुरक्षेच्या सर्व उपाययोजना करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. उपजिल्हा निवडणूक अधिकारी गंगाराम तळपाडे यांनी प्रास्ताविक केले, तर निवासी उपजिल्हाधिकारी नितीन गावंडे यांनी आभार मानले.

१५३ झोनल अधिकारी

निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार मतदारसंघातील ५० टक्के मतदान केंद्रांवर वेब कास्टिंगची सुविधा करण्यात येत आहे. मतदानाच्या दिवशी १५३ झोनल अधिकाऱ्यांची नियुक्ती केली असून, १७ अतिरिक्त अधिकारी राखीव ठेवण्यात आले आहेत. ज्या ठिकाणी गत पंचवार्षिकेत मतदानाची टक्केवारी कमी होती त्या ठिकाणी स्वीप उपक्रमांतर्गत मतदान जनजागृतीचे कार्यक्रम राबविण्यात आले आहे.

तसेच मतदान केंद्रावर देण्यात येणाऱ्या सुविधा, मतदान जनजागृतीसाठी राबविण्यात आलेले विविध उपक्रम, आचारसंहिता कक्ष तसेच इतर कक्ष करीत असलेले कार्य, दिव्यांग मतदारांसाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांची माहिती सादरीकरणाद्वारे श्री. गोयल यांनी दिली.

Attending the meeting regarding preparations for the Lok Sabha elections. Chokkalingam, Abhinav Goyal, Srikanth Dhiware, Vishal Narwade, Nitin Gawande.
Dhule Lok Sabha Election : मतदानाचा हक्क 407 मतदारांनी बजावला; अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी सुविधा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.