Maize Crop : बागायतीसह कोरडवाहू क्षेत्रात मका पिकाला अधिक ‘पसंती’! धुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून 118.6 टक्के पेरणी

Dhule News : म्हसदीत मक्यासाठी ५७ हजार ३७० हेक्टर सरासरी क्षेत्र असताना यंदा चक्क ६८ हजार ०३७ हेक्टर क्षेत्रावर म्हणजेच ११८.६ टक्के मका पेरणी झाली आहे.
Maize Crop
Maize Cropesakal
Updated on

म्हसदी : बऱ्यापैकी मागणी व बहुउपयुक्त असलेल्या ‘पिवळ्या’ सोन्याला अर्थात, मका पिकाला धुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांची चांगली पसंती दिल्याचे चित्र आहे. मक्यासाठी ५७ हजार ३७० हेक्टर सरासरी क्षेत्र असताना यंदा चक्क ६८ हजार ०३७ हेक्टर क्षेत्रावर म्हणजेच ११८.६ टक्के मका पेरणी झाली आहे. पांढऱ्या सोन्यानंतर (कपाशी) मका पिकाकडे शेतकऱ्यांनी अधिक लक्ष केंद्रित केले आहे. सध्या भीज पावसामुळे मक्याचे क्षेत्र तरारलेले दिसतंय. (Maize Crop)

कमी भांडवल, मर्यादित श्रम, बऱ्यापैकी उत्पन्न देणारे पीक म्हणून तृणधान्यातील इतर पिकांपेक्षा मका पिकाला अधिक पसंती दिली जात आहे. शिवाय मका काढणीनंतर तत्काळ दुसरे पीक घेण्याची शाश्‍वती यामुळे जिल्ह्यातील साक्री, शिंदखेडा, शिरपूर व धुळे चारही तालुक्यात मका शेतकऱ्यांचे लाडके पीक बनत आहे.

जिल्ह्यात गेल्या काही वर्षांपासून पीक पद्धतीत बदल होत असून, तृणधान्यातील पारंपरिक बाजरी, ज्वारी, कडधान्ये व तेलवर्गीय पिके कमी होत चालली आहेत. त्याची जागा प्रामुख्याने कांदा, मका व भाजीपाला पिकाने घेतली आहे.

मका एक उत्तम पर्याय!

कमी खर्चात, कमी कालावधीत मका हा उत्तम पर्याय ठरत आहे. पोल्ट्री, स्टार्च उद्योगामुळे मक्याला कायम मागणी असते.सांगली, सातारा, दोंडाईचा, शिरपूरसह गुजरात, तामिळनाडू सारख्या राज्यात व मलेशिया, व्हीएतनाम, युक्रेन या ठिकाणीही मोठ्या प्रमाणात मका निर्यात होतो.

वाढलेल्या मागणीमुळे गेल्या वर्षी खाजगी बाजारात दोन हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल भाव दिला होता.केंद्र सरकारने सुध्दा दोन हजार दोनशे पंचवीस रुपये हमी भाव निश्चित केल्याने मका परवडणारे पीक म्हणून शेतकऱ्यांच्या पसंतीस उतरले आहे.शिवाय मका पिकाचा चारा (कडबा) देखील मुबलक प्रमाणात उपलब्ध होतो.यातून शेतकऱ्यांच्या जनावरांचा पोटा पाण्याचा प्रश्न सुटतो. (latest marathi news)

Maize Crop
Dhule News : आयपीएस अब्दुर रहमान यांची याचिका फेटाळली! लोकसभा निवडणूक लढविण्याचे स्वप्न भंगले

मका पिकाला अच्छे दिन....

कमी पाण्यात, हलक्या जमिनीत मका हमखास येत असल्याचा शेतकऱ्यांचा अनुभव आहे. मका निघाला की लगेच रब्बीत गहू, कांदा पीक घेतले जाते. बागायतीसह कोरडवाहूतही मका घेतला जात आहे. मर्यादित किंमतीत बियाणे, खते, आंतरमशागत, कोळपणी, विरळणी, निंदणीसह काढणी खर्च अल्प, जनावरांना चारा झाकून ठेवत मका तयार करून केव्हाही विक्री करता येतो. त्यामुळे मका पीक जणू भरवशाचे झाले आहे.

जिल्ह्यातील मक्याचे क्षेत्र (हेक्टरमध्ये)

----------------------

तालुका‌ पेरणी

----------------------

साक्री : २९०१५

-------------------------

धुळे : १५८३२

--------------------------

शिंदखेडा : १३१००

-------------------------

शिरपूर : १००९०

Maize Crop
Dhule Plastic Ban : प्लॅस्टिक बंदीचे उल्लंघन; व्यापाऱ्यांना 20 हजार दंड

मका पेरणीचा काळ

खरिप हंगाम .......१५ जून ते १५ जुलै

---------

रब्बी हंगाम .........१५ ऑक्टोबर ते १५ नोव्हेंबर

--------

उन्हाळी ‌...... एक जानेवारी ते पंधरा फेब्रुवारी

---------------

"पूर्वी साक्री तालुक्यात कोरडवाहू क्षेत्रात सर्वाधिक पेरणी तृणधान्यातील बाजरीची होत होती. अलिकडे बाजरी पीक आंतरमशागतीसह निंदणी, कोळपणीच्या वाढत्या खर्चामुळे परवडत नाही. बागायतीतच काय तर कोरडवाहू क्षेत्रात मका पेरणीला प्राधान्य दिले जाते. मका धान्यासह चाऱ्यासाठी परवडणारे पीक आहे. कमी खर्च आणि कमी पाण्यातही मका पीक येऊ शकतो." - यशवंतराव देवरे, प्रगतिशील शेतकरी, म्हसदी

Maize Crop
Dhule News : हद्दवाढीत खडी-मुरुमाचे रस्ते! ‘एमजेपी‘चा पंचनामा; महापालिकेची महासभा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.