Dhule News : मोहगाव (ता. साक्री) ७०० ते ८०० लोकवस्तीचे गाव. हे गाव म्हणजे पिंपळनेरच्या पश्चिम पट्ट्यातील साक्री तालुक्यातील शेवटचे गाव व गुजरात सीमेवर वसलेले दऱ्याखोयांत असलेले गाव. हे १०० टक्के शेती व शेतकरी कोकणी, भिल्ल लोकवस्ती असलेले गाव असून, येथील पाच ते सहा तरुणांनी एकत्र येऊन ते सहा वर्षांपासून दर वर्षी प्रत्येक कुटुंबाला पाच. (Mango bloomed in Mohgaon Mango trees brought from Gujarat)
दहा, पंधरा किंवा वीस आंबा वृक्षाची रोपे देतात. त्यामुळे येथील शेतकरी ते वृक्ष आपल्या शेतातील बांधावर लावतात किंवा नापीक जमिनीवर लावतात. काही शेतकरी कुटुंबांनी या वर्षी आंबेदेखील विकले. मोहगावात ११० कुटुंबे दर वर्षी आंबा लागवडीसाठी पैसे गोळा करतात व गुजरातमधील वासदा येथे जाऊन केशर, लंगडा.
राजापुरी, तोतापुरी, हापूस या आंब्याचे कलम रोप तेथून विकत घेऊन गाडीत भरून आणतात व गावात पहिला पाऊस पडल्यावर ज्या कुटुंबाने आंबा रोपांसाठी वर्गणी दिली आहे त्यांना ती रोपे वाटप केली जातात. जेवढी नोंदणी तेवढीच रोपे दिली जातात. यासाठी येथील तरुणांनी एकत्र येऊन ही संकल्पना २०१८ मध्ये अमलात आणली.
त्यात विशाल गांगुर्डे, उमेश देशमुख, सुरेश चौरे, वामन चौरे, राजाराम गायकवाड, सोन्या चौरे, अरुण चौरे हे तरुण दर वर्षी या गावात आंबावृक्ष लागवडीसाडी प्रयत्न करतात व गावातील कुटुंबाचादेखील सहभाग असतो. गेल्या दोन वर्षांपासून प्रत्येक कुटुंबाला आंबा बागेपासून बऱ्यापैकी उत्पन्न मिळत आहे. आंबा क्वालिटीचा असल्याने बऱ्यापैकी भावदेखील मिळाला आहे. एकत्र विकल्यास पाइपलाइन, विहिरी खोलीकरण, गाळ काढणे अशी कामे आंब्याच्या पैशाने होऊन जातात. (latest marathi news)
वाढता वाढता वाढे आमराई
दरवर्षी दिल्या जाणाऱ्या रोपांची नोंद ठेवली जाते. जसे की २०१८ मध्ये प्रायोगिक तत्त्वावर ५०० रोपे आणली होती. २०१९ ला ६००, २०२० मध्ये ७००, २०२२ मध्ये ७००, २०२३ मध्ये ६५०, तर २०२४ मध्ये ७०० रोपे आणून वाटली गेली. दर वर्षी हा आकडा वाढत गेल्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याच्या बांधावर सरासरी २५ ते ३० झाडे कलमी आंब्याची असतील.
"आम्ही दर वर्षी मोहगाव येथील ११० कुटुंबे आंबा रोपांसाठी पैसे गोळा करतो. एकेकाने आणले तर महाग पडतात म्हणून आम्ही एकत्र पैसे गोळा करून कलमी आंब्याची रोपे गुजरातमधील वासदा येथून आणतो." - सुरेश चौरे, उपसरपंच, मोहगाव
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.