Dhule Marathon 2024: ‘हिट धुळे-फिट धुळे’सह जल्लोष! पोलिस कवायत मैदानावर फुल टू धमाल

रविवार सुटीचा दिवस आणि पोलिस मैदानावर सांस्कृतिक कार्यक्रमांच्या मेजवानीसह विविध सोयी-सुविधांची रेलचेल असल्याने धुळेकरांनी सुटीचा दिवस संस्मरणीय केला.
Dhule Marathon
Dhule Marathon esakal
Updated on

धुळे : ‘हिट धुळे-फिट धुळे’ हे घोषवाक्य आणि ‘रन फॉर पांझरा’अंतर्गत धुळे मॅरेथॉन स्पर्धा (सीझन २) येथील पोलिस मैदानावर रविवारी (ता. ४) पार पडली. तिला धुळेकरांसह राज्यभरातील स्पर्धकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याने आयोजकही सुखावले.

रविवार सुटीचा दिवस आणि पोलिस मैदानावर सांस्कृतिक कार्यक्रमांच्या मेजवानीसह विविध सोयी-सुविधांची रेलचेल असल्याने धुळेकरांनी सुटीचा दिवस संस्मरणीय केला. तसेच मैदानावर कुटुंब सदस्यांसह फुल टू धमाल केली. तरुणाईने जल्लोष एके जल्लोष केला. (Dhule Marathon Cheers with Hit Fit Dhule dhamaal on police drill ground)

जिल्हा पोलिस प्रशासनाचा पुढाकार आणि जिल्हाधिकारी कार्यालय, महापालिका, जिल्हा परिषद, जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय, तसेच शैक्षणिक क्षेत्रात अग्रेसर एसव्हीकेएम संस्था, रोटरी क्लब ऑफ धुळे क्रॉस रोड आणि ‘सकाळ’ माध्यम समूहाच्या साथीने धुळे मॅरेथॉन २०२४ (सीझन २) स्पर्धा झाली. त्यासाठी २५ हून अधिक संस्था, कंपन्यांनी योगदान दिले.

मॅरेथॉनचा बोलबाला

जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या अध्यक्षतेत आयोजन समितीप्रमुख अपर पोलिस अधीक्षक किशोर काळे व समिती सदस्यांच्या वेळोवेळी बैठका झाल्या.

तसेच जिल्हाधिकारी अभिनव गोयल, सीईओ शुभम गुप्ता, महापालिका आयुक्त अमिता दगडे-पाटील यांच्या उपस्थितीतही नियोजनाची बैठक पार पडली.

काटेकोर नियोजन व समन्वयामुळे पोलिस प्रशासनाच्या पुढाकाराने झालेल्या या स्पर्धेला सलग दुसऱ्या वर्षी अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा स्पर्धकांसह हौशी धुळेकरांनी अधिक गर्दी केली.

त्यामुळे आयोजकांचा उत्साह दुणावला. स्पर्धेसाठी उपस्थित सेलिब्रेटी, ब्रॅन्ड ॲम्बॅसेडर प्रभावित झाले. त्यांनी नियोजनासह सहभागी धुळेकरांच्या प्रतिसादाबाबत प्रशंसा केली. त्यामुळे सलग दुसऱ्या वर्षीही मॅरेथॉनचा बोलबाला राहिला.

Dhule Marathon
Girish Mahajan News : आठवडाभरात नवीन पर्यटन धोरण : गिरीश महाजन

फुल टू धमाल

पोलिस मैदानावर विविध गटांतील स्पर्धक परतल्यानंतर वातावरणात चैतन्य निर्माण झाले. आरंभ ढोलपथकाने धुळेकरांसह तरुणाईचा जोश वाढविला. हे ढोलपथक प्रत्येकाच्या पसंतीस उतरले. नंतर विविध गीतांवर विद्यार्थी, विद्यार्थिनींनी नृत्य सादर केले.

विविधरंगी कार्यक्रमांमुळे रंगत वाढत गेली. त्यात ठसकेबाज हिंदी, पंजाबी, मराठी गीतांवर तरुणाईने जल्लोष केला. रविवारचा दिवस असल्याने कुटुंबासह सहभागी झालेल्या स्पर्धकांनी फुल टू धमाल केली.

Dhule Marathon
Jalgaon Railway News: भुसावळ रेल्वेने जानेवारीत मिळविला 131 कोटींचा महसूल

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()