Dhule Marathon News : धुळे मॅरेथॉन तयारी; विजेत्यांना 2 लाखांची बक्षिसे

Dhule News
Dhule News esakal
Updated on

धुळे : येथील पोलिस ग्राउंडवर ५ फेब्रुवारीला बिनचूकपणे सकाळी सहाला सुरू होणाऱ्या जिल्हास्तरीय महामॅरेथॉन स्पर्धेत चार गटांतील विजेत्या प्रथम तीन महिला व पुरुषाला घशघशीत रोख पारितोषिक आणि आकर्षक करंडक प्रदान केला जाईल.

विजेत्यांवर सरासरी दोन लाख रुपयांहून अधिक रकमेच्या बक्षिसांचा वर्षाव होईल. दरम्यान, सोमवारी (ता. २९) सायंकाळपर्यंत तब्बल सात हजारांहून अधिक स्पर्धकांनी ऑनलाइन नोंदणी केली. स्पर्धकांची संख्या वाढतीच असल्याने आयोजन समितीने तयारीला वेग दिला आहे. (Dhule Marathon preparations Prizes of two lakhs to winners Dhule News)

Dhule News
Mumbai Crime News : नववीतील विद्यार्थ्याचा महिलेकडून लैंगिक छळ

धुळेकरांच्या निरामय आरोग्यासाठी आणि मॅरेथॉन स्पर्धा धुळ्याची ब्रॅन्ड होण्यासाठी जिल्हा पोलिस अधीक्षक संजय बारकुंड यांनी पुढाकार घेतला आहे. त्यांच्यासह जिल्ह्यातील दानशूर, शासकीय यंत्रणा आणि माध्यम प्रायोजक असलेल्या ‘सकाळ’ माध्यम समूहातर्फे ५ फेब्रुवारीला येथील पोलिस ग्राउंडवर मॅरेथॉन स्पर्धा होत आहे.

नोंदणी व स्पर्धा मोफत असेल. ‘फिट धुळे, हिट धुळे’ हे मॅरेथॉनचे घोषवाक्य आहे. मॅरेथॉन स्पर्धेत तीन किलोमीटर कुटुंबासाठी धाव (फॅमिली रन), पाच किलोमीटर, दहा किलोमीटर, तसेच २१ किलोमीटरचा गट आहे. पोलिस ग्राउंड, बारापत्थरमार्गे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याला वळसा घालून आग्रा रोडवरून मोठ्या पुलामार्गे दत्तमंदिर चौक, जिल्हा क्रीडासंकुल, गोंदूरपर्यंत विविध टप्प्यांत चार गटांतील स्पर्धक निकषानुसार अंतरावर परतीसह धावतील.

हेही वाचा : T+1 Settlement मुळे वाढेल शेअर बाजारातली उलाढाल

Dhule News
Dhule News : सोयी-सुविधांची बोंब; करआकारणी बेकायदा; बिले रद्द करण्याची मागणी

बक्षिसांचा वर्षाव

स्पर्धेत गटनिहाय अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांकाच्या विजेत्यास करंडकासह रोख पारितोषिक असे : ३ किलोमीटर (फॅमिली)- पाच हजार, तीन हजार, दोन हजार, ५ किलोमीटर- पाच हजार, तीन हजार, दोन हजार, १० किलोमीटर- दहा हजार, सात हजार, पाच हजार, २१ किलोमीटर- २१ हजार, ११ हजार, सात हजार रुपये.

शैक्षणिक क्षेत्रातील अग्रेसर एसव्हीकेएम, इंदूबाई भदाणे प्रतिष्ठान (बोरकुंड, ता. धुळे), रोटरी क्लब ऑफ धुळे क्रॉस रोड, एस. कांतिलाल ज्वेलर्स, ब्लॅक ओॲसिस टूर ॲन्ड ट्रॅव्हल्स, ऑटोमोबाईल असोसिएशन यांच्यासह अन्य दानशूरांच्या पाठबळाने विनामूल्य या स्पर्धेसाठी प्रत्येक स्पर्धकाला मेडल, नाश्ता बॉक्स, एनर्जी ड्रिंक, पाणी बॉटल मोफत दिल्या जातील. स्पर्धेत मोफत प्रवेश, मात्र नोंदणी बंधनकारक आहे.

Dhule News
Dhule News : शिंदखेड्यात उपोषणकर्त्यांची तब्येत ढासळली

एक्झिक्युटिव्ह वर्किंग कमिटीतील अपर पोलिस अधीक्षक किशोर काळे, सहाय्यक पोलिस अधीक्षक हृषीकेश रेड्डी, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत पवार, जिल्हा क्रीडाधिकारी आसाराम जाधव, मनपा उपायुक्त विजय सनेर, अशासकीय सदस्य आशिष अजमेरा, आशिष पटवारी, दीपक अहिरे, संग्राम लिमये, निखिल सूर्यवंशी, तसेच एलसीबीचे पोलिस निरीक्षक हेमंत पाटील, अधिकारी योगेश राजगुरू, वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलिस निरीक्षक धीरज महाजन आणि प्रभारी उपअधीक्षक शिवाजी बुधवंत कामकाज पाहत आहेत.

मुख्याध्यापकांची आज बैठक

स्पर्धेच्या मार्गावर स्पर्धकांना प्रोत्साहनासाठी विविध शाळांच्या विद्यार्थ्यांची पथके असतील. या संदर्भात नियोजनासाठी अपर पोलिस अधीक्षक किशोर काळे, माध्यमिकचे शिक्षणाधिकारी मोहन देसले यांच्या उपस्थितीत मुख्याध्यापकांची मंगळवारी (ता. ३१) पोलिस अधीक्षक कार्यालयात बैठक होणार आहे.

Dhule News
Dhule News : जमीन खरेदी- विक्रीत हेराफेरी; व्यापाऱ्याची कोटीत फसवणूक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.