Dhule Market Committee Election : तिसऱ्या पर्यायाने समीकरण बदलणे शक्य

Balasaheb Bhadane and representatives of various villages were present before the meeting held to suggest the third option for market committee elections.
Balasaheb Bhadane and representatives of various villages were present before the meeting held to suggest the third option for market committee elections. esakal
Updated on

धुळे : धुळे तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बोरकुंडचे (ता. धुळे) प्रथम लोकनियुक्त सरपंच बाळासाहेब भदाणे मित्रपरिवाराची प्राथमिक बैठक मंगळवारी (ता. २८) झाली. स्वबळावर निवडणूक लढण्याचा आग्रह झाला. (dhule market committee election Balasaheb Bhadane family to fight elections on their own dhule news)

ही तिसऱ्या पर्यायाची नांदी असणार आहे. निवडणुकीत बाळासाहेब भदाणे यांच्या रूपाने तिसरा पर्याय समोर आल्यास तालुक्याची राजकीय समीकरणे बदलणे शक्य आहे. याबाबत सर्वसमावेशक बैठकीत अंतिम निर्णय घेऊ, असे श्री. भदाणे यांनी सांगितले.

बैठकीत बोरी पट्ट्यासह तालुक्यातील ग्रामपंचायती व विविध कार्यकारी सहकारी संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. श्री. भदाणे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रभाकर पाटील, देवीदास माळी, पंचायत समितीचे माजी उपसभापती नारायण माळी, उपसभापती देवेंद्र माळी, सदस्य बाबाजी देसले, चेतन चौधरी, राजेंद्र पाटील, बोरकुंडचे सरपंच राजू मराठे, कापडणे सोसायटीचे अध्यक्ष राजा पाटील, नंदाळे खुर्दचे माजी सरपंच शंकर पाटील तसेच, संदीप पाटील, तिखीचे सरपंच श्रीराम पाटील, आर्वी सोसायटीचे अध्यक्ष नानासाहेब शिंदे, उपाध्यक्ष ज्ञानेश्‍वर शेणगे, होरपाडाचे सरपंच प्रभाकर खुरणे, नगावचे जितेंद्र पाटील, आंबोड्याचे उपसरपंच योगेश यादव,

हेही वाचा : जीएसटीसाठी नोंदणी केलीच नाही तर??

Balasaheb Bhadane and representatives of various villages were present before the meeting held to suggest the third option for market committee elections.
SAKAL Exclusive : यंदाही पाऊणशे कोटींच्या प्रलंबित 43 बिलांचा प्रश्नच!

मोरदड-तांडाचे देवीदास चव्हाण, धाडरी येथील राहुल पाटील, चांदेचे सरपंच रावसाहेब पाटील, चांदे सोसायटीचे संचालक छोटू पाटील, कुळथे येथील रमेश मराठे, बिलाडी सोसायटीचे मिलिंद शिंदे, आकाश शिंदे यांच्यासह विविध गावांतील प्रतिनिधी उपस्थित होते. चर्चेअंती बाजार समिती निवडणुकीबाबत रणनीती आखण्यात आली.

भदाणे मित्रपरिवाराने स्वबळावर लढण्याचा नारा दिला. या निवडणुकीत नेहमी प्रस्थापित चेहऱ्यांनाच संधी दिली जाते. तालुक्यातील सामान्य कार्यकर्त्यास न्याय देण्यासाठी तिसरा सक्षम पर्याय द्यावा, अशी मागणी झाली. विविध मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. स्वबळावर लढतीबाबत लवकरच सर्वसमावेशक बैठक बोलावली जाणार आहे.

Balasaheb Bhadane and representatives of various villages were present before the meeting held to suggest the third option for market committee elections.
Dhule News : दोंडाईचात कारमधून पळविली गाय; चोरटे मात्र फरार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()