Dhule News : म्हसदीत ग्रामपंचायतीने स्वबळावर सोडवला पाणीप्रश्‍न! स्थानिक निधीतून पाणीटंचाईवर केली मात

Dhule : पाणीटंचाईमुळे अनेक गावे व्याकूळ असून, पाणीपातळी खोल गेल्याने उपाययोजनाही फोल ठरत आहेत. म्हसदीत देखील पाणीटंचाईच्या झळा तीव्र झाल्या आहेत. एक दिवसाआड होणारा पाणीपुरवठा सात दिवसांवर गेला होता.
Village Panchayat staff installing an electric pump near a well at the base of the Kaykanda Dam. In second photo a well filled with water.
Village Panchayat staff installing an electric pump near a well at the base of the Kaykanda Dam. In second photo a well filled with water.esakal
Updated on

म्हसदी : पाणीटंचाईमुळे अनेक गावे व्याकूळ असून, पाणीपातळी खोल गेल्याने उपाययोजनाही फोल ठरत आहेत. म्हसदीत देखील पाणीटंचाईच्या झळा तीव्र झाल्या आहेत. एक दिवसाआड होणारा पाणीपुरवठा सात दिवसांवर गेला होता. ग्रामपंचायत प्रशासनाच्या प्रयत्नातून समस्येवर मात करत तीव्रता कमी करण्यात यश आले आहे. (Dhule Mhasdi village panchayat solved water issues on its own)

राज्यभर प्रसिद्ध असलेल्या आदिमाया धनदाईदेवीच्या यात्रोत्सवात येणाऱ्या भाविकांसाठी पाण्याची सुविधा उपलब्ध असेल. शासनाच्या मदतीची प्रतीक्षा न करता ग्रामपंचायत प्रशासनाने स्वबळावर स्थानिक उपलब्ध निधीतून टंचाईवर मात करण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे. यंदा अत्यल्प पावसामुळे साक्री तालुक्यातील अनेक गावे पाणीटंचाईने व्याकूळ झाली आहेत.

जलस्तर प्रचंड खोल गेल्याने शासनाच्या जलजीवन मिशनच्या नळपाणी पुरवठा योजनांनाही मर्यादा आल्या आहेत. म्हसदी येथेही पाण्याची समस्या वेगळी नव्हती. गाव मोठे असल्याने प्रत्येक प्रभागात पाणीपुरवठा करणे ग्रामपंचायत प्रशासनाला जिकिरीचे झाले होते. पाणीपुरवठा करणाऱ्या अमरावती नदीपात्रातील आमराईच्या विहिरीने तळ गाठला होता. पाणीटंचाईची तीव्रता ग्रामपंचायत प्रशासनाने ग्रामसभेत ग्रामस्थांना लक्षात आणून दिली. उपाययोजनाही करण्यात आल्या.

जुनी विहीर ठरणार आधार

कायकंडा धरणाच्या पायथ्याशी असलेल्या जुन्या विहिरीतील पाण्याचा उपयोग टंचाईकाळात होऊ शकतो, हा विचार पुढे आला. या विहिरीचे पाणी पाच-सहा वर्षांपासून वापराविना पडून होते. सुमारे ५५ फूट खोल विहीर पाण्याने तुडुंब भरलेली असून, प्रायोगिक तत्त्वावर तीन दिवस वीजपंप टाकत पाण्याचा उपसा करण्यात आला.

पातळी टिकून असल्याने ही विहिर येत्या पावसाळ्यापर्यंत गावाला बऱ्यापैकी पाणीपुरवठा करेल, असा विश्‍वास सरपंच शैलजा देवरे, उपसरपंच चंद्रकांत देवरे, निवृत्त विभाग नियंत्रक राजेंद्र देवरे, ग्रामविकास अधिकारी मेघश्याम बोरसे यांनी व्यक्त केला. (latest marathi news)

Village Panchayat staff installing an electric pump near a well at the base of the Kaykanda Dam. In second photo a well filled with water.
Dhule Lok Sabha Constituency : जिल्हा काँग्रेसची धुरा कोतवालांकडे! डॉ. शेवाळेंचा राजीनामा मंजूर

पंधराव्या वित्त आयोगाचे पाठबळ

यंदा दुष्काळाचे सावट असल्याने कर वसुलीवर परिणाम झाला आहे. अपेक्षित उत्पन्न नसल्याने ग्रामस्थांनी कर भरताना हात आखडता घेतला आहे. ग्रामपंचायतीने टंचाई निवारणासाठी पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीत पाणीपुरवठा कामांवर तरतूद करून ठेवल्याने तिचा सदुपयोग झाला आहे.

जुन्या विहिरीवरून गावांसाठी पाणीपुरवठा करण्यासाठी ९ लाख खर्च अपेक्षित आहे. या कामासाठी स्वतः सरपंच शैलजा देवरे, राजेंद्र देवरे, ग्रामविकास अधिकारी मेघश्याम बोरसे, वीज उपकेंद्राचे कनिष्ठ अभियंता बी. व्ही. सूर्यवंशी, वायरमन जगदीश देसले, ग्रामपंचायतीचे मुख्य लिपिक रवींद्र देवरे, कर्मचारी प्रवीण देवरे, सतीश देवरे, सचिन मोहिते, भूषण चव्हाण, समाधान देवरे, बाळा कोळी, विशाल चव्हाण आदींनी परिश्रम घेतले.

"गावाला पाणीपुरवठा करताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते. दुष्काळाची तीव्रता, वाढत्या उष्णतेमुळे पाणीपुरवठ्याची पाणीपातळी खालावली आहे. कायकंडा‌ धरणालगतच्या विहिरीच्या पाण्यामुळे दिलासा मिळणार आहे. भविष्याचा विचार करत पाणी काटकसरीने वापरा." - शैलजा देवरे, सरपंच, म्हसदी

Village Panchayat staff installing an electric pump near a well at the base of the Kaykanda Dam. In second photo a well filled with water.
Jalgaon Lok Sabha Election : निवडणुकीच्या तोंडावर पक्षप्रवेश जोरात; शिंदे गटाच्या अस्मिता पाटील शिवसेना ठाकरे गटात

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.