Dhule News : धुळ्यातून नागरिकांचे मोठ्या प्रमाणात स्थलांतर; पोलिस अधीक्षक धिवरेंकडून चिंता

Dhule : अनुचित घटनांमुळे शहरासह जिल्हा विकासासह सर्वच पातळीवर दहा ते पंधरा वर्षे मागे राहतो. या स्थितीत धुळ्यातून मोठ्या प्रमाणात नागरिकांचे स्थलांतर होत आहे
Shawwal Ansari speaking at a meeting held at the collector's office on the occasion of Eid. Abhinav Goyal, Srikanth Dhiware, Kishore Kale, Hrishikesh Reddy and others in the second picture.
Shawwal Ansari speaking at a meeting held at the collector's office on the occasion of Eid. Abhinav Goyal, Srikanth Dhiware, Kishore Kale, Hrishikesh Reddy and others in the second picture.esakal
Updated on

Dhule News : शहरासह जिल्ह्याला दंगलींचा इतिहास आहे. अशा अनुचित घटनांमुळे शहरासह जिल्हा विकासासह सर्वच पातळीवर दहा ते पंधरा वर्षे मागे राहतो. या स्थितीत धुळ्यातून मोठ्या प्रमाणात नागरिकांचे स्थलांतर होत आहे, अशी चिंता व्यक्त करत या विषयावर सर्वधर्मीयांनी गांभीर्याने विचार करावा, असे आवाहन जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी केले. ईद सण शांततेत पार पाडावा, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होऊ नये यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात गुरुवारी (ता. १३) बकरी ईदनिमित्त शांतता समितीची बैठक झाली. (migration of citizens from Dhule is concern of Superintendent of Police Dhivare )

जिल्हाधिकारी अभिनव गोयल, श्री. धिवरे, अपर पोलिस अधीक्षक किशोर काळे, सहायक पोलिस अधीक्षक ऋषीकेश रेड्डी, पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी भणगे, एलसीबीचे पोलिस निरीक्षक श्रीराम पवार व अन्य पोलिस अधिकारी, समितीचे सदस्य माजी उपमहापौर शव्वाल अन्सारी, साबीर शेख, अफसर पठाण, माजी नगरसेवक वसीम बारी, अमीन पटेल, मुक्तार मन्सुरी, डॉ. सर्फराज अन्सारी, गुफरानशेट पोपटवाले यांच्यासह मनपाचे अधिकारी उपस्थित होते.

चुकीचे मेसेज करू नये

जिल्हाधिकारी गोयल म्हणाले, की सण- उत्सव एकतेने साजरा करण्याची आपली परंपरा आहे. सोशल मीडियावर चुकीचे मेसेज वा व्हिडीओ व्हायरल करु नये. पवित्र ईद सण साजरा करण्यापूर्वी शहरातील मुलभूत सोयीसुविधा आणि स्वच्छतेवर विशेष लक्ष केंद्रीत करण्याची सूचना जबाबदार यंत्रणेला दिली जाईल. (latest marathi news)

Shawwal Ansari speaking at a meeting held at the collector's office on the occasion of Eid. Abhinav Goyal, Srikanth Dhiware, Kishore Kale, Hrishikesh Reddy and others in the second picture.
Dhule News : अपेक्षित रक्कम न मिळाल्याने विक्री बाजारातून बोकड माघारी; उलाढाल मंदावली

भारनियमनावर तोडगा काढण्याचा प्रयत्न करेल. कुर्बानीसाठी नेल्या जाणाऱ्या जनावराला टॅगिंग करणे आवश्यक आहे. कुठल्याही अप्रिय घटनेचे भांडवल करुन किंवा समाज माध्यमांवर चुकीचे संदेश वा चित्रीकरण प्रसारीत करु नये. मदतीसाठी प्रशासनाकडे यावे. एकोप्यासह शांततेत सण साजरा करावा.

तपासणी नाके व ड्रोन

पोलिस अधीक्षक धिवरे म्हणाले, की शहरात चौदा ठिकाणी तपासणी नाके असतील. ड्रोनद्वारे पोलिसांची शहरावर नजर राहील. ईद सण शांततेत पार पडण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे. सोमवारी बकरी ईदच्या पार्श्‍वभूमीवर सोशल मीडियाचा गैरवापर करू नये. अन्यथा, पोलिसांचा ८० टक्के वेळ केवळ सोशल मीडियावरील आक्षेपार्ह पोस्ट, बॅनर्स पाहणे, शोधण्यात जातो. त्यामुळे अन्य रचनात्मक कामकाजासाठी पुरेसा वेळ मिळत नाही. संविधानात सर्वधर्म एकाच रांगेत असल्याचे सांगितले आहे.

कोणताही धर्म श्रेष्ठ, कनिष्ठ मानलेला नाही. चांगला नागरीक होणे, देशभक्त होणे हे चांगल्या आचारविचारातून सिध्द केले पाहिजे. नियम, कायद्याची अंमलबजावणी करणे पोलिसांचे कर्तव्य आहे. कायदा सुव्यवस्थेची समस्या निर्माण होऊ नये यासाठी ड्रोनचा उपयोग केला जाणार आहे. उघड्यावर जनावारांची कुर्बानी देवू नका, असे आवाहन श्री. धिवरे यांनी केले. शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक धीरज महाजन यांनी प्रास्ताविक केले.

Shawwal Ansari speaking at a meeting held at the collector's office on the occasion of Eid. Abhinav Goyal, Srikanth Dhiware, Kishore Kale, Hrishikesh Reddy and others in the second picture.
Dhule News : ग्रामीण भागातील रस्त्यांची चाळण! साक्री तालुक्यातील स्थिती; आतातरी आश्वासनपूर्तीची नागरिकांची अपेक्षा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.