Dhule News : मोफत शिक्षणासाठी दर वर्षी साडेतीन कोटींचा खर्च : आमदार अमरिशभाई पटेल

Dhule : तालुक्यात सुमारे ४० हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. आदिवासीबहुल भागातील विद्यार्थी शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात यावेत यासाठी ‘शिरपूर सिक्स्टी’सारखे विविध उपक्रम राबवत आहोत.
MLA Amrishbhai Patel, Zilla Parishad Vice President Devendra Patil while inaugurating the tanker.
MLA Amrishbhai Patel, Zilla Parishad Vice President Devendra Patil while inaugurating the tanker.esakal
Updated on

Dhule News : तालुक्यात सुमारे ४० हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. आदिवासीबहुल भागातील विद्यार्थी शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात यावेत यासाठी ‘शिरपूर सिक्स्टी’सारखे विविध उपक्रम राबवत आहोत. आर्थिक बाबींमुळे कोणीही शिक्षणापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घेण्यासाठी दर वर्षी साडेतीन कोटी रुपये मोफत शिक्षणावर खर्च करीत आहोत, अशी माहिती आमदार अमरिशभाई पटेल यांनी दिली. (Dhule MLA Amrish Bhai Patel statement 3 Crore spent every year for free education)

जिल्हा परिषदेच्या १५ व्या वित्त आयोगातून तालुक्यात विविध कार्यक्रमांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या ३५ टँकरचे लोकार्पण २७ फेब्रुवारीला आमदार पटेल यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते.

जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष देवेंद्र पाटील, भाजपचे सांगवी मंडळ अध्यक्ष सत्तरसिंग पावरा, आदिवासी आघाडी जिल्हाध्यक्ष जयवंत पाडवी, रमण पावरा, विजय पारधी, भाजयुमो सांगवी मंडळ अध्यक्ष मंजित पवार, किसन पाटील, माजी उपनगराध्यक्ष वासुदेव देवरे, जगन टेलर, भूपेश परदेशी, भाजयुमो जिल्हा उपाध्यक्ष राज सिसोदिया, अनिल पाटील आदी उपस्थित होते.

सिंचन व आरोग्य क्षेत्रात भरीव गुंतवणूक

तालुक्यातील शेती ओलिताखाली आणण्यासाठी शिरपूर पॅटर्न मालिकेतील ३७० बंधारे पूर्ण झाले आहेत. अनेक भागांतील कामे प्रगतिपथावर आहेत. ५०० कोटी रुपये खर्चाचे एक हजार बेडचे हॉस्पिटल साकारले जात आहे. (latest marathi news)

MLA Amrishbhai Patel, Zilla Parishad Vice President Devendra Patil while inaugurating the tanker.
Dhule News : वडणे येथील प्राथमिक शिक्षक निलंबित; सीईओ गुप्तांकडून कारवाई

प्रत्येक क्षेत्रात तालुका स्वावलंबी झाला पाहिजे या भूमिकेतून सिंचन व आरोग्य क्षेत्रात मोठी गुंतवणूक केली आहे. विद्यार्थ्यांच्या शिक्षणाबाबत कोणतीच तडजोड केली जाणार नाही. संपूर्ण तालुका केवळ साक्षर नव्हे तर उच्चशिक्षित झाला पाहिजे असा ध्यास असल्याचे आमदार पटेल यांनी सांगितले. जयवंत पाडवी यांनी प्रास्ताविक करून आभार मानले.

येथे मिळणार टँकरसेवा

ग्रामपातळीवर आयोजित विविध समारंभांसाठी पाण्याची सुविधा व्हावी या हेतूने ३५ टँकर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्यात पळासनेर जिल्हा परिषद गटात उमर्दा, दोंदवाडा, झेंडेअंजन, हेंदऱ्यापाडा, वकवाड, बोराडी गटात बोराडी, बुडकीविहीर, खाऱ्यापाडा, सलईपाडा, बुडकी, शिंगावे गटासाठी दोन टँकर, हिसाळे गटात पाच टँकर, रोहिणी गटात पाच टँकर, भाटपुरा गटात सात टँकर, वाघाडी गटात एक टँकर देण्यात आला.

MLA Amrishbhai Patel, Zilla Parishad Vice President Devendra Patil while inaugurating the tanker.
Dhule News : पिकांचे मोठे नुकसान, तत्काळ पंचनामा करा : आमदार कुणाल पाटील

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.