Dhule News : जिल्हा रुग्णालयाच्या श्रेणीवर्धनास मंजुरी : आमदार फारूक शाह

Dhule : शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या जुन्या जिल्हा रुग्णालयाचे श्रेणीवर्धन अर्थात दोनशे खाटांच्या प्रस्तावाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंजुरी दिली आहे, अशी माहिती आमदार फारूक शाह यांनी दिली.
Hospital Bed (file photo)
Hospital Bed (file photo)esakal
Updated on

Dhule News : शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या जुन्या जिल्हा रुग्णालयाचे श्रेणीवर्धन अर्थात दोनशे खाटांच्या प्रस्तावाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंजुरी दिली आहे, अशी माहिती आमदार फारूक शाह यांनी दिली. जिल्हा रुग्णालयाच्या श्रेणीवर्धनासाठी दोन वर्षांपासून आपण प्रयत्नशील होतो, असे आमदार शाह यांनी म्हटले आहे.

धुळे शहरातून वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय स्थलांतरित झाल्यानंतर दूर अंतरावर असलेल्या या रुग्णालयामुळे शहरातील नागरिकांची हेळसांड होत होती. (Dhule MLA Farooq Shah Statement Chief Minister Eknath Shinde approves proposal of two hundred beds for old district hospital)

त्यामुळे जुन्या जिल्हा रुग्णालयाचे सक्षमीकरण व्हावे यासाठी आपण प्रयत्नशील होतो. राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात सार्वजनिक आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या दालनात या संदर्भात विशेष बैठक आयोजित करून रुग्णालयाच्या श्रेणीवर्धनाचा प्रश्‍न आपण ऐरणीवर आणला. त्या वेळी आरोग्यमंत्री सावंत यांनी श्रेणीवर्धन प्रस्ताव मान्य करण्याचे अभिवचन दिले होते.

त्यानुसार मुख्यमंत्री शिंदे यांनी श्रेणीवर्धन प्रस्तावास मंजुरी दिल्याचे आमदार शाह यांनी म्हटले आहे. सद्यःस्थितीत शहरातील जुन्या जिल्हा रुग्णालयात शंभर खाटा अस्तित्वात असून, स्त्री-पुरुष वैद्यकीय विभाग, नेत्रचिकित्सा विभाग. (latest marathi news)

Hospital Bed (file photo)
Dhule News : अमळथ्यात भगरीतून विषबाधा; 50 ते 60 जणांवर शिंदखेडा ग्रामीण रुग्णालयात उपचार

मनोरुग्ण विभाग, अतिदक्षता विभाग व ऑपरेशन थियटर यासाठी सुमारे १३७ प्रशिक्षित कर्मचारी मंजूर आहेत. ७३ कंत्राटी कर्मचारी या विभागात कार्यरत आहेत.

दरम्यान, श्रेणीवर्धनामुळे शंभर खाटांचे दोनशे खाटांत रूपांतर होईल व नाक-कान-घसा यांसारखे नवीन विभाग कार्यरत होतील. तसेच कर्मचाऱ्यांची संख्याही दुप्पट होईल. त्यामुळे रुग्णांची हेळसांड होणार नाही, शहरापासून लांब असलेल्या वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयावर अवलंबून राहावे लागणार नाही, असे आमदार शाह यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

Hospital Bed (file photo)
Dhule News : धुळ्यातील 9 मान्यवरांसह संस्था पुरस्कारांचे ‘मानकरी’; सामाजिक न्याय विभागातर्फे विविध पुरस्कार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.