Dhule News : बांधकाम कामगारांना तालुकानिहाय भांडीवाटप : आमदार कुणाल पाटील

Dhule : बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडून नोंदणीकृत कामगारांना धुळे शहराजवळील वरखेडी-कुंडाणे रोडलगत असलेल्या गुदामातून गृहोपयोगी वस्तूंचा संच म्हणजे भांड्यांचे वाटप करण्यात येत आहे.
Kunal Patil giving a statement to Suresh Khade on pot allocation issue.
Kunal Patil giving a statement to Suresh Khade on pot allocation issue.esakal
Updated on

Dhule News : महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडून नोंदणीकृत कामगारांना धुळे शहराजवळील वरखेडी-कुंडाणे रोडलगत असलेल्या गुदामातून गृहोपयोगी वस्तूंचा संच म्हणजे भांड्यांचे वाटप करण्यात येत आहे. या भांडीवाटप केंद्रावर लाभार्थ्यांची गर्दी होते. त्यांची गैरसोय टाळण्यासाठी कामगारमंत्र्यांकडे तालुकानिहाय विशेष वाटप केंद्र सुरू केले जावे, अशी मागणी केली.

त्यावर मंत्र्यांनी तसे केंद्र सुरू करण्याची सूचना यंत्रणेला दिल्याची माहिती आमदार कुणाल पाटील यांनी दिली. (Dhule MLA Kunal Patil statement Taluk wise distribution of utensils to construction workers)

आमदार पाटील म्हणाले, की भांड्यांचा लाभ मिळण्यासाठी धुळे शहरातील केंद्रावर लाभार्थी तीन-तीन दिवस ठाण मांडून मुक्कामी बसत आहेत. त्यामुळे लाभार्थ्यांची गैरसोय होत आहे. कामगार लाभार्थ्यांची गैरसोय दूर व्हावी यासाठी तालुकानिहाय गृहोपयोगी भांडीवाटप केंद्र सुरू करावे, अशी मागणी गुरुवारी (ता. २९) कामगारमंत्री सुरेश खाडे यांच्याकडे केली.

त्यानुसार तालुकानिहाय गृहोपयोगी भांड्यांचे वाटप करण्याची सूचना मंत्र्यांनी बांधकाम कामगार विभागाचे सचिव विवेक कुंभार यांना दिली. त्यामुळे धुळे तालुक्यातील इमारत व इतर बांधकाम कामगारांची गैरसोय दूर होणार आहे.

नोंदणीकृत इमारत व इतर बांधकाम कामगारांच्या सोयीसाठी गृहोपायोगी भांडीवाटप केंद्र तालुकानिहाय सुरू करावे या मागणीसाठी मंत्री खाडे यांची भेट घेतली. यात मागणीचे पत्र दिले. धुळे शहरालगत वरखेडी-कुंडाणे रोडलगत भांडीवाटप केंद्रातून नोंदणीकृत कामगांराना गृहोपयोगी भांड्यांच्या संचाचे वाटप केले जात आहे. (latest marathi news)

Kunal Patil giving a statement to Suresh Khade on pot allocation issue.
Dhule News : मोफत शिक्षणासाठी दर वर्षी साडेतीन कोटींचा खर्च : आमदार अमरिशभाई पटेल

या केंद्रावर लाभार्थ्यांची प्रचंड गर्दी होत आहे. त्यात अनेक वेळा भांडे घेण्यासाठी रांगेत उभे राहताना वादविवाद उद्‌भवत आहेत. उसळलेली गर्दी आणि त्यातून निर्माण होणारे वाद यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे तालुकानिहाय गृहोपयोगी भांडीवाटप केंद्र सुरू करावे, अशी मागणी केल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले.

पाणी व नोंदणीचा प्रश्‍न

भांडीवाटप केंद्रावर लाभार्थ्यांसाठी पिण्याचे पाणी व इतर मूलभूत सोयी-सुविधा देण्यात याव्यात, अशी मागणी केली. तसेच इमारत व इतर बांधकाम कामगारांची धुळ्यातील जयहिंद महाविद्यालयाजवळील कार्यालयात कामगारांना विविध योजनांचा लाभ मिळवून घेण्यासाठी नोंदणी करावी लागते.

या ठिकाणीही गर्दी होत असून, कामगारांना दिवसभर नोंदणीसाठी उभे राहावे लागते. तरीही अनेक कामगारांची नोंदणी होत नाही. पुन्हा त्यांना दुसऱ्या दिवशी नोंदणीसाठी यावे लागते. मंडळनिहाय नोंदणी कार्यालय सुरू करण्याची मागणी मंत्र्यांकडे केल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले.

Kunal Patil giving a statement to Suresh Khade on pot allocation issue.
Dhule News : जीएसटी लुटीतील रक्कम व्यापाऱ्याला सुपूर्द

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.