सोनगीर : लाटीपाडा धरणाचे पाणी अक्कलपाडा धरणाकडे वर्ग करण्याची अन्यायकारक कार्यवाही पाटबंधारे विभाग करीत असल्याने धुळे तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांना हक्काच्या पाण्यासाठी वंचित राहावे लागत असून, शेतीला सिंचनासाठी पाणी मिळत नाही. ही कार्यवाही त्वरित थांबवून रब्बी हंगामासाठी शेतीला पाणी द्यावे, अशी आमदार कुणाल पाटील यांची मागणी तापी विकास महामंडळ व लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाने मान्य केली. त्यामुळे धुळे तालुक्यातील नऊ हजार ६०० एकर शेतीला लाभ होईल. (MLA Patil statement of Latipada water to Akkalpada Dam Class )