धुळे : वाघोदे (ता. शिंदखेडा) शिवारातील जिंदाल प्लांट सौर ऊर्जा प्रकल्पाच्या कार्यालयात रविवारी (ता. ६) दुपारी दहा ते बारा जणांनी अनधिकृतरीत्या प्रवेश करून कर्मचाऱ्यांना बेदम मारहाण केली. तसेच कार्यालयातील वस्तूंची तोडफोड करत ठार मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी नामांकित जिंदाल प्लांटचे कार्यकारी अधिकारी प्रवीण रोहिदास सोनवणे यांच्या फिर्यादीनुसार रविवारी (ता. ६) दुपारी साडेबाराच्या सुमारास वाघोदे (ता. शिंदखेडा) शिवारातील जिंदाल पॉवर प्लांटच्या सोलर प्लांट विभागात संशयित योगेश पाटील, योगेश शालीक माळी, गणेश योगेश कोळी, योगेश ठाकरे (सर्व रा. वाघोदे) यांच्यासह सात ते आठ जण लोखंडी रॉड, लाकडी दांडके घेऊन शिरले. ( Mob rampage crime against 12 people vandalized Jindal company office in Waghode Shivar )
येथे काम करणाऱ्यांना जिवंत सोडणार नाही, अशी धमकी देत प्रमुख अनुप शर्मा यांना धक्काबुक्की केली. भीम प्रजापती या कामगारावर योगेश पाटील याने लोखंडी रॉडने वार केला. त्याने वार चुकविला असता वार त्याच्या डोळ्याजवळ लागला. त्यानंतर योगेश पाटील याने सोनू गुप्ता याच्या डोक्यावर वार केला. योगेश शालीक माळी, गणेश अशोक कोळी या दोघांनी लाकडी दांडक्याने मनीष गुप्ता याला मारहाण केली. जमावाने मुख्य प्रवेशद्वारावरील कंट्रोल रूम आणि सीसीटीव्ही रूमसह सुरक्षा रूममध्ये घुसून ठार मारण्याची धमकी दिली. तसेच कंट्रोल रूममधील लॅपटॉप, प्रिंटर, खुर्च्या, टेबलावरील काच, रूमच्या खिडक्या आदी साहित्यांची तोडफोड केली. त्यानुसार संशयित १२ जणांविरुद्ध नरडाणा पोलिस ठाण्यात दंगलीसह अन्य कलमांतर्गत गुन्ह्याची नोंद झाली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.