Dhule Monsoon Rain : शिंदखेड्यात वीज पडून बैलासह 2 म्हशी ठार; घरावर लिंबाचे झाड कोसळून नुकसान

Monsoon Rain : चिमठाणे (ता. शिंदखेडा) परिसरात दहा वर्षानंतर मंगळवारी (ता.११) दुपारी चारच्या सुमारास मृग नक्षत्राचा प्रथमच वादळी वाऱ्यासह विजांच्या गडगडाटासह दमदार पाऊस झाला.
A lemon tree fell on the house of Ran Singh Bhil, causing damage to the roof of the house and household items.
A lemon tree fell on the house of Ran Singh Bhil, causing damage to the roof of the house and household items.esakal
Updated on

Dhule Monsoon Rain : चिमठाणे (ता. शिंदखेडा) परिसरात दहा वर्षानंतर मंगळवारी (ता.११) दुपारी चारच्या सुमारास मृग नक्षत्राचा प्रथमच वादळी वाऱ्यासह विजांच्या गडगडाटासह दमदार पाऊस झाला. खलाणे गावशिवारात सायंकाळी साडेचारच्या सुमारास वीज पडून एक बैल ठार झाला. तसेच, निशाणे येथे एक म्हैस व हातनूर येथे एक गाय आणि एक म्हैस वीज पडून ठार झाली. पिंप्री येथील घरावर लिंबाचे झाड पडून नुकसान झाले. ( 2 buffaloes along with bull were dead by lightning )

चिमठाणे परिसरात मंगळवारी दुपारी चारच्या सुमारास वादळी वाऱ्यासह विजांच्या गडगडाटासह एक तास दमदार पाऊस झाला. या पावसामुळे शेतातील बांध फोडून शेताबाहेर पाणी निघाले. पावसामुळे शेतकरी सुखावला असून, कापूस व मका लागवडीला वेग येणार आहे. वादळी वाऱ्यामुळे वृक्ष व वीजेचे खांब उन्मळून पडले आहेत. अनेक गावातील वीजेचे खांब उन्मळून पडल्याने रात्रभर बत्ती गुल होती.

रात्री उशीरापर्यंत रिमझिम पाऊस पडत होता. पिंप्री येथे रणसिंग रामसिंग भील यांच्या राहत्या घरावर मंगळवारी दुपारी साडेचारच्या सुमारास छतावर लिंबाचे झाड पडून घराचे व संसारोपयोगी वस्तूंचे नुकसान झाले. खलाणे शिवारात मंगळवारी दुपारी साडेचारच्या सुमारास वादळी वाऱ्यासह तुरळक स्वरूपाचा पाऊस झाला. (latest marathi news)

A lemon tree fell on the house of Ran Singh Bhil, causing damage to the roof of the house and household items.
Jalgaon Pre-Monsoon Rain : मॉन्सूनपूर्व पावसाचे जोरदार आगमन; पारोळा, यावल, रावेरसह अनेक ठिकाणी बरसल्या सरी

खलाणे येथील शेतकरी प्रकाश देवराम देसले यांच्या शेतात वीज पळून एक बैल ठार झाला. तलाठी डी. व्ही. बावीस्कर यांनी प्राथमिक अहवाल तहसीलदार ज्ञानेश्‍वर सपकाळे व नायब तहसीलदार बन्सिलाल वाडीले यांच्याकडे सादर केला आहे.

नुकसानीचा अहवाल सादर

हातनूर शिवारात मंगळवारी सव्वापाचच्या सुमारास वादळी वाऱ्यासह तुरळक पाऊस झाला. भडाणे येथील शेतकरी विठ्ठल आत्माराम पाटील यांच्या मालकीची हतनूर गाव शिवारातील गट क्रमांक ३३४ मध्ये वीज पडून त्यांची एक म्हैस ठार झाली. तलाठी एन. एस. माजलकर यांनी प्राथमिक अहवाल तहसील कार्यालयात सादर केला.

निशाणे शिवारात मंगळवारी वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला. खळ्याजवळ वीज पडून शेतकरी रंजय आबाजी पाटील यांच्या मालकीची एक म्हैस ठार झाली. तलाठी डी. व्ही. बावीस्कर यांनी शिंदखेडा तहसील कार्यालयात प्राथमिक अहवाल सादर केला आहे.

A lemon tree fell on the house of Ran Singh Bhil, causing damage to the roof of the house and household items.
Dhule Pre-Monsoon Rain : कापडणे परिसरात मुसळधार पावसाची हजेरी; शेतकरी सुखावला

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.