Dhule Monsoon Rain : अखेर यंदा पहिल्यांदाच ‘पांझरा’ खळाळली! अक्कलपाड्यातून विसर्ग सुरू; नागरिकांना खबरदारीचे आवाहन

Monsoon Rain : पांझरा नदीच्या ठिकाणी नाल्याजवळील रहिवाशांची जवळच्या शाळेत पर्यायी व्यवस्था केल्याची सूचनाही अतिक्रमण विभागाकडून देण्यात आली.
Ongoing discharge from Akkalpada project into Panzra river
Ongoing discharge from Akkalpada project into Panzra riveresakal
Updated on

Dhule Monsoon Rain : ऑगस्ट सुरू झाला तरी शहरातील पांझरा नदी प्रवाहित झाली नाही. दरम्यान, रविवारी (ता. ४) अक्कलपाडा प्रकल्पातून पाणी सोडल्याने अखेर यावर्षी पहिल्यांदाच पांझरा नदी खळाळल्याचे पाहायला मिळाले. पांझरेत टप्प्याटप्प्याने पाण्याचा विसर्ग वाढविल्याने अक्कलपाडा प्रकल्प उपविभागातर्फे पांझरा काठच्या नागरिकांना खबरदारीची सूचना देण्यात आली.

या पार्श्वभूमीवर धुळे महापालिका प्रशासनानेही आपत्कालीन कक्षाची बैठक घेत विविध सूचना केल्या. पांझरा नदीच्या ठिकाणी नाल्याजवळील रहिवाशांची जवळच्या शाळेत पर्यायी व्यवस्था केल्याची सूचनाही अतिक्रमण विभागाकडून देण्यात आली. (Finally this year for first time Panzra river flowed)

पांझरा नदी पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे तसेच अक्कलपाडा प्रकल्पाच्या वरील बाजूस असणाऱ्या पांझरा, मालनगाव आणि जामखेडी प्रकल्पातून पाण्याचा येवा वाढल्याने निम्न पांझरा अर्थात अक्कलपाडा प्रकल्पातही पाणीसाठा वाढत आहे. या पार्श्वभूमीवर अक्लपाडा प्रकल्पातून रविवारी पाणी सोडण्यात आले.

सकाळी अकरा वाजून ४२ मिनिटांनी एक हजार २५० क्यूसेक, दुपारी तीनला तीन हजार ५०० क्यूसेक, तर सायंकाळी पाचला सहा हजार क्यूसेक पाणी सोडण्यात आले. टप्प्याटप्प्याने पाण्याचा विसर्ग वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर पांझरा नदीकाठच्या नागरिकांनी आवश्यक खबरदारी घ्यावी, असे आवाहन अक्कलपाडा प्रकल्प उपविभागाचे कार्यकारी अभियंता (धुळे मध्यम प्रकल्प विभाग व सहाय्यक अभियंता श्रेणी-१) यांच्यातर्फे करण्यात आले.

मनपात बैठक

पांझरा नदीपात्रात अक्कलपाडा प्रकल्पातून पाणी सोडल्याने पाण्याचा विसर्ग वाढण्याची शक्यता लक्षात घेता व आपत्कालीन स्थिती उद्‍भवल्यास करावयाच्या उपाययोजनांबाबत धुळे महापालिका आयुक्त तथा प्रशासक अमिता दगडे-पाटील यांनीही रविवारी महापालिकेत आपत्कालीन कक्षातील अधिकारी, कर्मचाऱ्यांची बैठक घेतली. पांझरा नदीच्या ठिकाणी नाल्याजवळील रहिवाशांना अतिक्रमण विभागाकडून जाहीर सूचना देण्यात आली. महापालिकेने जवळच्या शाळेमध्ये येथील रहिवाशांची राहण्यासाठी पर्यायी व्यवस्था केल्याचे सांगण्यात आले. (latest marathi news)

Ongoing discharge from Akkalpada project into Panzra river
Dhule Monsoon Rain: पावसाच्या सरीवर सरी... पण जलस्तरासाठी मुसळधारेची प्रतीक्षा! साक्री, शिंदखेडा तालुक्यांवर वरुणराजा रुसला

अधिकारी नियुक्त

आवश्यक त्या परिस्थितीत साहित्य व साधनांसह सज्ज राहण्याचे आदेश बैठकीत देण्यात आले. पूरस्थिती निर्माण झाल्यास आवश्यक ती वैद्यकीय व्यवस्था, पुनर्वसन व्यवस्था व आपत्कालीन व्यवस्था सुसज्ज ठेवण्याच्या दृष्टीने आवश्यक त्या सूचना दिल्या. यासाठी क्षेत्रनिहाय अधिकारी-कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. बैठकीला सर्व अभियंते, स्वच्छता निरीक्षक, विभागप्रमुख उपस्थित होते.

धोकादायक घरांना बॅनर

पावसाची संततधार सुरू असल्याच्या पार्श्वभूमीवर धुळे मनपा अतिक्रमण निर्मूलन विभागातर्फे शहरातील जीर्ण, धोकादायक घरे, इमारतीच्या भोगवटाधारकांनाही आपले वास्तव्य संबंधित घरे, इमारतीतून हलवावे, असे आवाहन करत तेथे तशा आशयाचे बॅनर लावण्यात आले. काही दुर्घटना घडल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित घरांच्या भोगवटाधारकांची राहील, असा इशाराही दिला.

Ongoing discharge from Akkalpada project into Panzra river
Nashik Rain: Godavari River Flood, पंचवटी परिसरातील मंदिरे पाण्याखाली | Monsoon update

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.