Dhule News : धुळ्यात प्रभाग 1 मध्ये सर्वाधिक झगमगाट! LED पथदीपांची स्थिती; अद्यापही 3628 एलईडींची गरज

Dhule News : आतापर्यंत बसविण्यात आलेल्या पथदीपांची आकडेवारी पाहता प्रभाग क्रमांक १ मध्ये सर्वाधिक पथदीप लागले आहेत, तर सर्वांत कमी प्रभाग १३ मध्ये लागले. १७ हजारांवर पथदीपांमध्ये सर्वाधिक ३० व ४५ वॅटचे आहेत.
Street Light
Street Lightesakal
Updated on

Dhule News : एलईडी पथदीपांनी धुळे शहर उजळून टाकण्यासाठी महापालिकेने १३.६५ कोटी रुपयांचा डीपीआर मंजूर केला. २०२१ मध्ये यातून शहरात एलईडी पथदीप बसविण्यास सुरवात झाली. मात्र हे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. अर्थात २०२३ पर्यंत तब्बल १७ हजार ६७७ एलई़डी पथदीप बसविले गेले.

त्यानंतरही तब्बल तीन हजार ६२८ पथदीप बसविणे बाकी आहे. आतापर्यंत बसविण्यात आलेल्या पथदीपांची आकडेवारी पाहता प्रभाग क्रमांक १ मध्ये सर्वाधिक पथदीप लागले आहेत, तर सर्वांत कमी प्रभाग १३ मध्ये लागले. १७ हजारांवर पथदीपांमध्ये सर्वाधिक ३० व ४५ वॅटचे आहेत. (Dhule Status of LED street lights)

धुळे महापालिकेतील तत्कालीन सत्ताधारी भाजपने धुळे मनपा हद्दीतील शहर व देवपूर भागात जुने पथदीप काढून नवीन एलईडी पथदीप बसविणे व त्यांची पाच वर्षे देखभाल-दुरुस्तीसाठी १३.६५ कोटींच्या मंजूर डीपीआरमधून २०१२ मध्ये निविदा प्रक्रियेअंती मे. श्री वल्लभ इलेक्ट्रिकल्स (गुजरात) यांना काम दिले.

ठेकेदाराला महापालिकेने २०२१ मध्ये कार्यादेश दिला. त्यानंतर एलईडी पथदीप बसविण्यास सुरवात झाली. मात्र, पहिल्यापासूनच एलईडी पथदीप बसविण्याबाबत सत्ताधारी, विरोधी नगरसेवकांच्या तक्रारी पाहायला मिळाल्या.

आमच्या भागात कमी पथदीप लागले आहेत, अंधार आहे, नागरिकांच्या तक्रारी असल्याने पथदीप लावा, अशा मागण्या स्थायी समिती, महासभेत झाल्याचे पाहायला मिळाले. या तक्रारी डिसेंबर-२०२३ मध्ये नगरसेवकांचा पंचवार्षिक कालावधी संपेपर्यंत कायम राहिल्या, आजही आहेत.

अद्यापही काम अपूर्ण

काम होत असताना कामाच्या तुलनेनुसार बिल मिळत नसल्याच्या तक्रारी ठेकेदाराकडून पहिल्यापासून पाहायला मिळाल्या. त्यामुळे पथदीप बसविण्याच्या कामात ब्रेक लागत गेला. दरम्यान, रडत-कुढत नोव्हेंबर २०२३ पर्यंत ठेकेदाराकडून धुळे शहरात एकूण १७ हजार ६७७ एलईडी पथदीप बसविण्यात आल्याचा दावा आहे.

त्यानुसार दहा-अकरा कोटी रुपयांचे काम झाले. मात्र चार कोटी रुपये बिल महापालिकेकडून अदा होत नाही त्यामुळे ठेकेदाराने कामाला पुन्हा ब्रेक लावला. दरम्यान, ही स्थिती कायम असल्याने अखेर आता महापालिकेच्या प्रशासकीय स्थायी समितीने पथदीपांच्या तक्रारी सोडविण्यासाठी शहराचे तीन भाग करून हे काम तीन ठेकेदारांना दिले आहे.

अर्थात वल्लभ इलेक्ट्रिकल्सला बाय-बाय करण्यात येईल हे उघड आहे. मात्र, वल्लभ इलेक्ट्रिकल्सकडून उर्वरित काम करून घेण्याच्या सूचना आयुक्त तथा प्रशासक अमिता दगडे-पाटील यांनी दिल्या आहेत. त्यानुसार काय घडामोडी घडतात त्याकडे लक्ष असेल. (latest marathi news)

Street Light
पंतप्रधान शेतकरी सन्मान योजना खाते अपडेटच्या नावाखाली होतेय फसवणूक,अशी घ्या काळजी

आठ प्रभागांत झगमगाट

दरम्यान, आतापर्यंत लागलेल्या १७ हजार ६७७ एलईडी पथदीपांची आकडेवारी पाहिली तर सर्वाधिक एक हजार ६४२ पथदीप प्रभाग १ मध्ये लागले आहेत, तर सर्वांत कमी ३८७ पथदीप प्रभाग १३ मध्ये लागले.

शहरातील १९ प्रभागांपैकी आठ प्रभागांत प्रत्येकी हजारावर एलईडी लागले आहेत. चार प्रभागांमध्ये पाचशेच्या आसपास पथदीप लागले. कोणता प्रभाग किती मोठा हा भाग आहेच पण आकडेवारीवरून सर्वसाधारणपणे प्रभाग १ तुलनेने फायद्यात दिसतो. प्रभाग १३ तुलनेने अंधारात आहे असे म्हणावे लागेल.

३० वॉटचे सर्वाधिक बल्ब

एकूण १७ हजार ६७७ एलईडी पथदीपांपैकी सर्वाधिक पाच हजार ८७५ पथदीप ३० वॉटचे आहेत. पाच हजार ४३७ पथदीप ४५ वॉटचे, ९० वॉटचे दोन हजार ६००, ६० वॉटचे दोन हजार ९३२, १०० वॉटचे ५२७, १५० वॉटच्या ३०६ पथदीपांचा यात समावेश आहे. तीन हजार ६२८ पथदीप बदलण्याची अद्यापही गरज आहे. विशेष म्हणजे यात ३३७ खांबांवर जुनाही पथदीप नाही अर्थात पथदीपांशिवाय हे खांब उभे आहेत.

प्रभाग...नवीन एलईडी पथदीप...जुने पथदीप

-प्रभाग-१...१६४२...१७२

-प्रभाग-२...१४९७...१९१

-प्रभाग-३...८११...२१५

-प्रभाग-४...१२२४...२७१

-प्रभाग-५...१२११...१६९

-प्रभाग-६...८३०...१६०

-प्रभाग-७...५६२...१३४

-प्रभाग-८...५९१...१८२

-प्रभाग-९...८६५...१७४

-प्रभाग-१०...५९२...१८१

-प्रभाग-११...१०७८...१४२

-प्रभाग-१२...६९६...२७१

-प्रभाग-१३...३८७...२५१

-प्रभाग-१४...११०५...१४३

-प्रभाग-१५...५९१...१६७

-प्रभाग-१६...६३५...१३७

-प्रभाग-१७...११८८...१३५

-प्रभाग-१८...१३८४...१७२

-प्रभाग-१९...७८८...१२४

Street Light
NTA NEET-UG Exams : भावी डॉक्टरांचे भविष्य अन्‌ जीवही टांगणीला..!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.