धुळे : धुळ्यातील जनतेने माझ्यावर फुलांचा वर्षाव बुलडोझरने करीत माणसे जोडण्याचे काम केले आहे, तर उत्तर प्रदेशात भाजपचे सरकार बुलडोझरच्या साहाय्याने माणसे तोडण्याचे काम करीत आहे. हाच फरक जातीयवादी व समाजवादी विचारसरणीत आहे. समाजवादी पक्ष माणसे जोडण्याचे काम करतो, तर भाजप माणसे तोडण्याचे काम करतो, अशी टीका समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार अखिलेश यादव यांनी येथे केली. (Work of breaking people from BJP )