Dhule News : शहरात महाशक्ती प्रदर्शन आणि महारॅली काढत महायुतीतील भाजपचे उमेदवार खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी सोमवारी (ता. २९) जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल केला. जाहीर सभेत पालकमंत्री गिरीश महाजन, सार्वजनिक बांधकाममंत्री दादा भुसे. (MP Dr. Subhash Bhamre filed his nomination)
आमदार जयकुमार रावल आणि उमेदवार डॉ. भामरे यांनी मोदी नामाचा जप करत त्यांना पंतप्रधानपदी पुन्हा आरूढ करायचे असल्याचे स्पष्ट केले. मनोहर टॉकीजवळील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून महाशक्ती प्रदर्शन करीत महायुतीने महारॅली काढली. राष्ट्रभक्तीच्या घोषणा देत महाविजय रथामधून उमेदवार डॉ. भामरे.
पालकमंत्री महाजन, बांधकाममंत्री भुसे, आमदार रावल, भाजपचे महामंत्री विजय चौधरी, भाजपचे शहर-जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर, माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, आमदार मंजुळा गावित, जिल्हा परिषद अध्यक्षा धरती देवरे, जितेंद्र चौवटिया, मनसेचे माजी आमदार जयप्रकाश बाविस्कर, भाजप शहर विधानसभा क्षेत्रप्रमुख अनुप अग्रवाल,
बाळासाहेब भदाणे, शिवसेना शिंदे गटाचे डॉ. तुळशीराम गावित, मनोज मोरे, सतीश महाले यांच्यासह आरपीआय, लोकजनशक्ती पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे पदाधिकारी सहभागी झाले. आग्रा रोडवर रॅलीत ठिकठिकाणी पुष्पवृष्टी झाली. मनसेने उमेदवारासह नेत्यांचे स्वागत केले. जिजामाता हायस्कूलजवळ रॅलीचे सभेत रूपांतर झाले. (Latest Marathi News)
श्रीराम मंदिराचे श्रेय जनतेलाच आहे. जनतेने भाजपचे ३०३ खासदार निवडून दिले. त्यामुळेच श्रीराम मंदिर होऊ शकले. देशात पुन्हा पंतप्रधानपदी मोदी आणि खासदारपदी डॉ. भामरे यांना निवडून आणायचे आहे, असे कार्यकर्त्यांना सांगत श्री. महाजन यांनी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यावर विश्वास ठेवू नका, असे विधान केले.
मंत्री भुसे म्हणाले, की एक दिवसही सुटी न घेणाऱ्या पंतप्रधान मोदी यांनी विकासाच्या चांगल्या योजना आणल्या. राज्यातील जागा ४५ पार करू, असा विश्वास आहे. माजी महापौर जयश्री अहिरराव, प्रतिभा चौधरी, माजी महापौर चंद्रकांत सोनार, प्रदीप कर्पे, माजी उपमहापौर कल्याणी अंपळकर, नागसेन बोरसे, डॉ. माधुरी बाफना, माजी सभापती सुनील बैसाणे.
शीतल नवले, वैशाली शिरसाट, ॲड. रोहित चांदोडे, सुधाकर बेंद्रे, प्राची कुळकर्णी, मनसे शहराध्यक्ष बंटी सोनवणे, डॉ. राहुल सुभाष भामरे, शिवसेना शिंदे गटाचे संजय वाल्हे, दिलीप साळवे, आरपीआयचे शशिकांत वाघ, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष कैलास चौधरी, सत्यजित सिसोदे, समीत पवार आदी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.