Dhule Municipality News : मनपाचे 1,728 कोटींचे अंदाजपत्रक मंजूर; हद्दवाढीत 22 जलकुंभ

Dhule Municipality : महापालिका स्थायी समितीने अंतिम रूरुप दिलेल्या एक हजार ७२८ कोटी रुपयांच्या अंदाजपत्रकाला महापालिका प्रशासकीय महासभेने मंजुरी दिली.
Dhule Municipal Corporation
Dhule Municipal Corporationesakal
Updated on

Dhule Municipality News : हद्दवाढ क्षेत्रातील पाणीपुरवठा यंत्रणा सक्षम करणे, पाणीपुरवठा योजनेसाठी कमांड कंट्रोल रूम, महिलांना व्यवसाय प्रशिक्षण, दिव्यांगांना व्यवसायासाठी अर्थसहाय्य, बचतगट उत्पादन विक्रीसाठी एकता मॉल, ई-बससेवा, ट्रक टर्मिनस, मनपा शाळांची दुरुस्ती, मॉडेल शाळा, महापालिकेचा पंचकर्म दवाखाना अद्ययावत करून त्याला गतवैभव देणे आदी स्वप्नांसह महापालिका स्थायी समितीने अंतिम रूरुप दिलेल्या एक हजार ७२८ कोटी रुपयांच्या अंदाजपत्रकाला महापालिका प्रशासकीय महासभेने मंजुरी दिली. (Dhule Municipal budget of 1728 crore approved)

या नव्या स्वप्नांना आकार देण्याचा सर्वार्थाने प्रयत्न करण्याचे आश्‍वासन मनपा आयुक्त तथा प्रशासकांनी यानिमित्ताने दिले. ‘रहे ना रहे हम... महका करेंगे’ असे म्हणत त्यांनी प्रशासकांच्या, विशेषतः महिला अधिकाऱ्यांच्या कार्यकाळातील कामे धुळेकरांच्या आठवणीत राहतील, असा विश्‍वासही एका अर्थाने व्यक्त केला.

प्रशासकीय स्थायी समितीने मंजुरी दिलेल्या धुळे महापालिकेचे २०२३-२४ चे सुधारित व २०२४-२५ चे मूळ अंदाजपत्रकाला महासभेची मान्यता घेण्यासाठी मंगळवारी (ता. २७) सकाळी अकराला महापालिका सभागृहात प्रशासकीय अंदाजपत्रकीय महासभा झाली.

मनपा आयुक्त तथा प्रशासक अमिता दगडे-पाटील, नगरसचिव मनोज वाघ, अतिरिक्त आयुक्त करुणा डहाळे, उपायुक्त डॉ. संगीता नांदूरकर, उपायुक्त शोभा बाविस्कर, उपायुक्त श्री. निकम, मुख्य लेखाधिकारी गजानन पाटील यांच्यासह विभागप्रमुख, अधिकारी उपस्थित होते. श्रीमती दगडे-पाटील यांनी मनोगतातून अंदाजपत्रकातील तरतुदींचा ऊहापोह केला.

धुळे शहराच्या एकूण अर्थव्यवस्थेमुळे महापालिकेच्या उत्पन्नवाढीला मर्यादा आहेत. त्यामुळे शहर विकासासाठी निधी कमी पडतो. परिणामी शासनाच्या योजनांचा पुरेपूर लाभ घेऊन नागरिकांना जास्तीत जास्त नागरी सुविधा पुरविण्याचा प्रयत्न आहे. वॉटर, गटार, मीटरला कात्री लावून महिला, मुले, दिव्यांग कल्याण, दवाखाना, शाळा आदी कामांना प्राधान्य देण्याचा, ‘रिझल्ट ओरिएंटेड बजेट’ देण्याचा आम्ही प्रयत्न केल्याचे प्रशासक श्रीमती दगडे-पाटील यांनी सांगितले. (Latest Marathi News)

Dhule Municipal Corporation
Dhule Municipality News : थकबाकी न भरल्याने मंगल कार्यालय ‘सील’; महापालिका पथकाची कारवाई

हद्दवाढ क्षेत्रात २२ जलकुंभ

अमृत-१ मध्ये शहरासाठी जीवनदायिनी अक्कलपाडा पाणीयोजनेचे काम झाल्यानंतर आता अमृत-२ मध्ये हद्दवाढ क्षेत्रातील पाणीपुरवठा यंत्रणा सक्षम होणार आहे. या योजनेतून हद्दवाढ क्षेत्रात २२ जलकुंभ उभे राहणार आहेत. जलवाहिन्या टाकण्यात येणार आहेत. यासाठी १४२.७६ कोटींचा प्रस्ताव मंजूर आहे.

कमांड कंट्रोल रूम

शहरातील पाणीपुरवठा योजना सक्षम करण्यासाठी योजनेचे ऑटोमायझेशन करण्यात येत आहे. पाणीयोजनेचे नियंत्रण एकाच ठिकाणावरून संगणकीय पद्धतीने व्हावे यासाठी कमांड कंट्रोल रूम निर्माण करण्यात येईल. प्रेशर मीटर, जलकुंभांवर लेव्हल इंडिकेटर, प्रायोगिक तत्त्वावर वॉटर मीटर बसविण्यात येतील.

एकता मॉलची निर्मिती

बचतगटांना चालना मिळावी यासाठी त्यांनी उत्पादित केलेल्या वस्तूंच्या विक्रीसाठी महापालिकेमार्फत स्वतंत्र मॉल (एकता मॉल) उभारण्याचा संकल्प बजेटमध्ये करण्यात आला. शहरातील सावता माळी मार्केट येथे हा मॉल प्रस्तावित आहे. महिला व बालकल्याणच्या निधीतून महिला, मुलींना व्यावसायिक प्रशिक्षण, कायदेविषयक, आरोग्यविषयक शिबिरांचे आयोजन होईल. सफाई कामगारांच्या मुलींसाठी सुकन्या योजना राबविली जाईल.

शाळांचा विकास

गेल्या अनेक वर्षांपासून दुर्लक्षित मनपा शाळांची स्थिती सुधारण्याचा संकल्पही करण्यात आला. यात प्रामुख्याने शाळा-८ व २० डिजिटायझेशन, मॉडेल स्कूलचे काम करण्यात येणार आहे. मॉडेल स्कूलसाठी दोन कोटी, शाळा दुरुस्तीसाठी ५० लाखांची तरतूद करण्यात आली.

Dhule Municipal Corporation
Dhule News : कृषिकन्यांकडून जनावरांचे लसीकरण

याशिवाय पंचकर्म दवाखान्यासाठी ५० लाख, पांझरा नदी स्वच्छता व संवर्धन, महापालिकेत नवीन चौथा टॉवर (इमारत) बांधणे, महापुरुषांचे पुतळे/चबुतरे, वृक्षलागवड, ऑक्सिजन पार्क आदी कामांचाही समावेश करण्यात आला आहे.

ठळक तरतुदी अशा (आकडे कोटीत) राज्यस्तरीय नगरोत्थान...१०१.९८

अमृत-२.० (पाणीपुरवठा, भूमिगत गटार)...८५७.२७

मूलभूत सोयीसुविधा...२९.९५

ई-बससेवा...१८.४२

ट्रक टर्मिनस...५.००

शाळा दुरुस्ती...०.५०

मॉडेल शाळा...२.००

पंचकर्म, आरोग्यवर्धिनी...०.५०

महापुरुष पुतळे...३.००

मनपा जुनी इमारत शॉपिंग सेंटर...१.००

नवीन व्यापारी संकुल...१०.००

मनपा नवीन इमारत (चौथा टॉवर)...५.००

एकता मॉल...०.५०

महिला व बालकल्याण...१.७५

दिव्यांग कल्याण...१.७५

विविध योजनांचा मनपा हिस्सा...१३०.०७

२०२४-२५ चे अंदाजपत्रक असे

मनपा प्रशासन...७२५.३५ कोटी

प्रशासकीय स्थायी समिती...१७२८.१२ कोटी

Dhule Municipal Corporation
Dhule News : रेल्वेस्थानकाचे आधुनिकीकरण, 24 ठिकाणी अंडरपास : खासदार डॉ. भामरे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.