Dhule Municipality News : सुधारित कर आकारणीच्या प्रक्रियेला ‘ब्रेक’!

Dhule Municipality : महापालिका क्षेत्रातील मालमत्तांना सुधारित कर आकारणीची प्रक्रिया महापालिकेकडून सुरू आहे.
Dhule Municipal Corporation
Dhule Municipal Corporation esakal
Updated on

Dhule Municipality News : महापालिका क्षेत्रातील मालमत्तांना सुधारित कर आकारणीची प्रक्रिया महापालिकेकडून सुरू आहे. यात शहरातील पेठ भाग व चाळीसगाव रोड भागात सुधारित कर आकारणीच्या नोटिसावाटपाचे काम सुरू होते. मात्र, आता लोकसभा निवडणुकीमुळे या प्रक्रियेला ब्रेक लागला आहे. परिणामी निवडणुकीच्या निकालानंतर अर्थात जूनमध्येच ही प्रक्रिया पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे. (Dhule Municipal corporation Brake on revised taxation process)

दरम्यान, पेठ भाग व चाळीसगाव रोड भागात आत्तापर्यंत १४ हजारांवर नोटिसांचे वाटप झाले आहे. धुळे महापालिकेने हद्दवाढ क्षेत्रातील अकरा गावांसह संपूर्ण शहरातील मालमत्तांना सुधारित मालमत्ता करयोग्यमूल्य निर्धारणाची प्रक्रिया सुरू केली. यात प्रारंभी हद्दवाढ क्षेत्रातील प्रक्रिया पूर्ण झाली. त्यानंतर देवपूर व साक्री रोड भागासाठी प्रक्रिया राबविली गेली.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी शहरातील पेठ भाग व चाळीसगाव रोड भागातील मालमत्ताधारकांना सुधारित कर आकारणीच्या नोटिसा बजावण्याची कार्यवाही सुरू होती. या प्रक्रियेत एकूण १४ हजार ५४६ नोटिसा वाटप झाल्या. मात्र, अद्यापही सुमारे २० ते २५ हजार नोटिसा वाटपाचे काम बाकी आहे.

लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम व परिणामी आचारसंहिता लागू झाल्याने नोटिसा वाटपाच्या या प्रक्रियेला ब्रेक लागला. महापालिकेचे मनुष्यबळ निवडणुकीच्या कामातही गुंतले आहे. शिवाय मार्चअखेर मालमत्ता करवसुलीचे कामही डोक्यावर असल्याने विशेषतः मालमत्ता कर विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांची तारेवरची कसरत सुरू आहे. (latest marathi news)

Dhule Municipal Corporation
Dhule News : पांझरा-कान साखर कारखाना सुरू करण्यासाठी पुन्हा प्रयत्न

दोन महिन्यांनंतरच कार्यवाही

लोकसभा निवडणुकीचा निकाल जूनमध्ये लागणार आहे. त्यामुळे सुधारित कर आकारणीच्या नोटिसा वाटप, या नोटिसांवर प्राप्त हरकतींवरील सुनावणीची प्रक्रियादेखील स्वाभाविकपणे लांबणार आहे. परिणामी या एकूणच प्रक्रियेला आता पुन्हा विलंब होणार आहे.

अडीच हजार हरकती

दरम्यान, पेठ भाग व चाळीसगाव रोड भागात वाटप झालेल्या नोटिसांनंतर या भागातूनदेखील मोठ्या प्रमाणावर हरकती दाखल होण्याची चिन्हे आहेत. या भागातून आत्तापर्यंत महापालिकेकडे दोन हजार ४२० हरकती दाखल झाल्या आहेत.

जसजशा नोटिसा वाटप होतील तसे हरकती दाखल होण्याची प्रमाणदेखील वाढणार आहे. यापूर्वी हद्दवाढ, देवपूर, साक्री रोड भागातूनही मोठ्या संख्येने हरकती दाखल झाल्या होत्या.

Dhule Municipal Corporation
Dhule News : 9 रिक्षाचालकांवर दंडात्मक कारवाई

किमान ४५ कोटी वसुलीचे लक्ष्य

दरम्यान, मार्चअखेर जास्तीत जास्त मालमत्ता करवसुलीचे प्रयत्न महापालिका प्रशासनाकडून सुरू आहेत. यासाठी मार्चअखेर १०० टक्के शास्तीमाफी योजनाही लागू आहे. असे असले तरी अद्याप ३८ कोटी २३ लाख रुपये करवसुली झाली आहे.

राज्य शासनाकडूनही जास्तीत जास्त करवसुलीसाठी तगादा सुरू आहे. शासकीय अनुदानाचा लाभ घेण्यासाठी मागील वर्षी वसूल झालेल्या रकमेपेक्षा किमान १५ टक्के जास्त वसुली आवश्‍यक आहे. मागील वर्षी महापालिकेकडून सुमारे ३७ कोटी मालमत्ता कर वसूल झाला होता.

त्यामुळे यंदा किमान ४३ ते ४५ कोटी रुपये वसूल होणे अपेक्षित आहे. त्यामुळे किमान हा आकडा गाठता यावा, असा मनपा अधिकाऱ्यांचा प्रयत्न असणार आहे. त्यासाठी नऊ दिवस हातात आहेत.

Dhule Municipal Corporation
Dhule Agriculture News : लाखावर टन खतांचे आवंटन कृषी विभागाच्या मागणीतून मंजूर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()