Dhule News : सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर महापालिकेकडून पुन्हा मोकाट जनावरांच्या बंदोबस्तासाठी कर्मचाऱ्यांना आदेश काढण्यात आला आहे. मात्र, मोकाट जनावरे पकडून ज्या गोशाळेत ते जमा केले जातात, त्या गोशाळेचेही यापूर्वीचे बिल महापालिकेने थकविले आहे. त्यामुळे संबंधित संस्थेकडून आता बिलाची मागणी होत असून, बिल द्या अन्यथा जनावरे गोशाळेत आणू नका, असा इशाराच दिल्याचे समजते. शहरातील मोकाट जनावरे व इतर जनावरांची समस्या महापालिकेला सोडविता आलेली नाही. (Dhule Municipality News)
महापालिकेचा जनावरांचा कोंडवाडाही आता इतिहासजमा झाला आहे. त्यामुळे सण-उत्सवांच्या काळात मोकाट जनावरे पकडून ती गोशाळेत जमा केली जातात. मोकाट जनावरांना चारा-पाण्याची व्यवस्था करण्यासाठी संबंधित गोशाळेला प्रतिजनावर/प्रतिदिन याप्रमाणे महापालिकेला बिल अदा करावे लागते.
शहरातील मालेगाव रोडवरील खानदेश गोशाळेचे मागील काळातील बिल महापालिकेकडे थकले आहे. हे बिल अदा न झाल्याने गोशाळेकडून आता बिल अदा करा अन्यथा जनावरे आणू नका, असा इशारा दिल्याचे समजते.
बिले थकविण्याची परंपरा
महापालिकेकडून शहरात विविध कामे होतात. संबंधित संस्था, ठेकेदारांना बिल अदा करताना मात्र महापालिका हात आखडता घेते. इतर अनेक ठिकाणी पाण्यासारखा पैसा खर्च करून महापालिका मोकळी होते. काही मर्जीतल्या ठेकेदारांची बिले कधीच पेंडिंग राहत नाहीत.
मर्जीतल्या बाहेरचे मात्र बिलांसाठी चकरा मारत राहतात. अनेक मोठमोठी कामे ठेकेदाराची बिले अदा न केल्याने थांबल्याची उदाहरणे आहेत. आता यात गोशाळेच्या एक-दीड लाख रुपये बिलाचाही समावेश झाल्याचे दिसते. (latest marathi news)
जनावरांचा बंदोबस्त करा
११ एप्रिलला रमजान ईद साजरी होणार आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील पांझारा नदीकाठावरील ईदगाह मैदान, मोमीन कब्रस्तान, चाळीसगाव रोड कब्रस्तान, वडजाई रोडवरील मदरसा व परिसरातील मशीद आदी भागात नमाजपठण करण्यासाठी मुस्लिम बांधव एकत्र येतात.
या सर्व भागात साफसफाई करावी, मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्यासाठी कर्मचाऱ्यांची नेमणूक करावी. तसेच १४ एप्रिलला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शहरातून मिरवणुका निघतात. या पार्श्वभूमीवर मुख्य रस्ते, चौकात साफसफाई करावी, मोकाट जनावरे फिरताना दिसणार नाहीत याची दक्षता घ्यावी.
मिरवणूक मार्गावरील विटा, दगड उचलावेत. मिरवणूक मार्गात साफसफाई नसल्यास, मोकाट जनावरे आढळल्यास संबंधित भागातील स्वच्छता निरीक्षकांना जबाबदार धरून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जाईल, असा इशारा स्वच्छता निरीक्षकांना दिला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.