धुळे : मराठा समाजाला सरसकट आरक्षण मिळावे यासाठी लढणारे मनोज जरांगे-पाटील यांच्या मुंबईतील आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी धुळे, नंदुरबार जिल्ह्यातून शेकडो समाजबांधव पदयात्रेने निघाले आहेत.
त्यांनी नाशिक जिल्हा ओलांडत सोमवारी (ता. २२) नगरमार्गे प्रस्थान केले. (dhule Nandurbar crossed Nashik Maratha community members march in support of reservation issue Jarange)
श्री. जरांगे-पाटील २० जानेवारीला हजारो मराठा समाजबांधवांसह अंतरवाली-सराटी (जि. जालना) येथून मुंबईकडे पदयात्रेने निघाले आहेत. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी ते मुंबईत आंदोलन करणार आहेत.
त्यांच्या पदयात्रेत धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातील शेकडो समाजबांधव नगरपासून सहभागी होणार आहेत. त्यासाठी नाशिकमार्गे या दोन जिल्ह्यांतील मराठा समाजबांधव पदयात्रेसह विविध वाहने, ट्रक, टेम्पो ट्रॅक्ससह नगरकडे रवाना झाले आहेत.
यात समाजाचे समन्वयक विनोद जगताप, उल्हास यादव, श्याम रायगुडे, निंबा मराठे, सुनील पाटील, राजेंद्र काळे, मनोज ढवळे, दीपक रौंदळ, श्याम रायगुडे, तर नंदुरबार जिल्ह्यातून नितीन जगताप, महेंद्र मराठे, गुलाब महारू मराठे, येडू मराठे, अनिल मराठे, सुभाष मराठे, विवेक पाटील, चेतन राजपूत, जितेंद्र मराठे, खंडू कदमबांडे, पंकज मराठे आदी वाहनांसह पदयात्रेत सहभागी आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.