Dhule News : महाराष्ट्र विधान परिषदेच्या नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघ द्विवार्षिक निवडणुकीसाठी बुधवारी (ता.२६) मतदान होणार आहे. मतदानावेळी मतदान केंद्रावर ओळख पटविण्यासाठी जे मतदार छायाचित्रासह मतदार ओळखपत्र (ईपीक) सादर करू शकत नाहीत, अशा मतदारांना त्यांची ओळख पटविण्यासाठी पर्यायी पुरावा म्हणून भारत निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या दहा अतिरिक्त ओळखपत्रांपैकी एक ओळख कागदपत्र सोबत आणावे असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अभिनव गोयल यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे. (Nashik Division Teachers Constituency Election 10 proofs of identity card required)
या दहा अतिरिक्त ओळखपत्रांमध्ये आधार कार्ड, वाहन चालविण्याचा परवाना, पॅन कार्ड, भारतीय पासपोर्ट, केंद्र-राज्य शासन, सार्वजनिक उपक्रम, सार्वजनिक मर्यादित कंपनीचे स्वत:चे छायाचित्र असलेले नोकरी ओळखपत्र, खासदार, आमदारांनी जारी केलेले अधिकृत ओळखपत्र, शैक्षणिक संस्थांनी आपल्या कर्मचाऱ्यांना जारी केलेले सेवा ओळखपत्र, विद्यापीठाने जारी केलेले पदवी, पदविकेचे मूळ प्रमाणपत्र, सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेले शारीरिक अपंगत्वाचे मूळ प्रमाणपत्र, भारत सरकारच्या सामाजिक न्याय व सशक्तीकरण मंत्रालयाने जारी केलेले विशेष विकलांगता प्रमाणपत्र यांचा यात समावेश आहे. (latest marathi news)
मतदारांना आवाहन
भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार संबंधित सर्व मतदान केंद्राध्यक्ष यांनी मतदारांच्या छायाचित्र ओळखपत्रातील मतदाराचे नाव, वडिलांचे, आईचे, पतीचे नाव, लिंग, वय किंवा पत्त्याशी संबंधित नोंदीमधील किरकोळ विसंगती दुर्लक्षित करता येईल आणि मतदाराला मतदान करण्याची परवानगी दिली जाऊ शकेल.
तरी मतदारांनी मतदान करताना ओळख पटविण्यासाठी आपले छायाचित्रासह मतदार ओळखपत्र आणावे किंवा भारत निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या अतिरिक्त ओळख कागदपत्रांपैकी एक ओळख कागदपत्र सोबत आणावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी गोयल यांनी केले आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.