National Lok Adalat : पुन्हा एक दिवस शंभर टक्के शास्ती माफ! 27 जुलैला राष्ट्रीय लोकअदालतीनिमित्त संधी

Dhule News : मनपा हद्दीतील थकबाकीदार मालमत्ताधारकांना पुन्हा एकदा मालमत्ता कर शास्ती (दंड)तून १०० टक्के सूट मिळण्याची संधी उपलब्ध झाली आहे.
Dhule Municipal Corporation
Dhule Municipal Corporationesakal
Updated on

Dhule News : मनपा हद्दीतील थकबाकीदार मालमत्ताधारकांना पुन्हा एकदा मालमत्ता कर शास्ती (दंड)तून १०० टक्के सूट मिळण्याची संधी उपलब्ध झाली आहे. २७ जुलैला होणाऱ्या राष्ट्रीय लोकअदालतीच्या निमित्ताने ही संधी आहे. मनपा हद्दीतील मालमत्ता कर थकबाकीदारांनी या संधीचा लाभ घ्यावा, थकबाकी अदा करावी, असे आवाहन महापालिका आयुक्त तथा प्रशासकांनी केले आहे. (National Lok Adalat)

शहरासह हद्दवाढीतील मालमत्ताधारकांकडे महापालिकेची सुमारे ४० कोटी रुपये थकबाकी आहे. जिल्हा न्यायालय, धुळे येथे २७ जुलै २०२४ ला राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. या लोकअदालतीमध्ये धुळे महापालिकेच्या थकीत मालमत्ता कराची वसुली होण्यासाठी थकबाकीदार मालमत्ताधारकांना १०० टक्के मालमत्ता कर शास्ती माफी योजना राबविण्यात येणार आहे.

दरम्यान, यापूर्वी मालमत्ता कराचा भरणा केलेल्या मालमत्ताधारकांना या योजनेचा लाभ मिळणार नाही किंवा परतावादेखील दिला जाणार नाही. योजनेचा लाभ घेण्यासाठी थकबाकीदारांना त्यांच्याकडे थकीत संपूर्ण मालमत्ता कर व पाणीपट्टी भरणे आवश्‍यक आहे.

कर भरण्यासाठी सुविधा

शहरातील मालमत्ताधारकांना थकबाकी कराचा भरणा करता यावा यासाठी धुळे महापालिका प्रशासनाने २७ जुलैला व्यवस्था केली आहे. २७ जुलैला धुळे जिल्हा न्यायालयात आयोजित राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये मालमत्ता कर भरण्याची व्यवस्था असेल. तसेच धुळे मनपा कार्यालयात येऊन धनादेशाद्वारे, तसेच धुळे मनपा नवीन प्रशासकीय इमारतीतील बँकेत रोख स्वरूपात कर भरता येईल. (latest marathi news)

Dhule Municipal Corporation
Dhule Encroachment News : 20 हेक्टर वनजमिनीवरील अतिक्रमण हटविले! वन विभागाची जांभोरा क्षेत्रात धडक कारवाई

ऑनलाइन व्यवस्था अशी

कर भरण्यासाठी सिटिझन ॲपचाही वापर करता येईल. यासाठी प्ले-स्टोअरमधून धुळे ई-कनेक्ट टाइप केल्यास धुळे सिटिझन ॲप येईल ते डाउनलोड करून रजिस्टर करावे. हद्दवाढ क्षेत्रातील गावांचा ऑनलाइन कर भरणा करण्यासाठी https://dhulemc.org व पाणीपट्टी भरणा करण्यासाठी https://dhulemcwaterbill.org या वेबसाइट उपलब्ध आहेत.

तसेच महापालिकेच्या संबंधित भागातील कर्मचाऱ्यांशी संपर्क करून जास्तीत जास्त थकबाकीदारांनी शास्तीमाफी योजनेचा लाभ घ्यावा व कराचा भरणा करावा, असे आवाहन मनपा आयुक्त तथा प्रशासक अमिता दगडे-पाटील यांनी केले आहे.

Dhule Municipal Corporation
Dhule Agriculture News : धुळे तालुक्यात पिकांच्या वाढीस पोषक पाऊस; निंदणीवर अधिक खर्च

चाळीस कोटी थकबाकी

सद्यःस्थितीत हद्दवाढ क्षेत्रासह संपूर्ण शहरातील अनेक मालमत्ताधारकांकडे मोठ्या प्रमाणावर मालमत्ता कर, पाणीपट्टी थकीत आहे. दर वर्षी थकबाकीचा हा आकडा कमी होत नाही. या वर्षीदेखील तशीच स्थिती आहे. सुमारे ४० कोटी रुपये थकबाकी असल्याचे अधिकारी सांगतात. दर वर्षी प्रशासनाकडून शास्तीमाफी योजना राबविली जाते.

मात्र, त्यानंतरही थकबाकीचा आकडा कमी होताना दिसत नाही. अर्थात या योजनेचा अनेक थकबाकीदार लाभही घेतात. या वर्षी मार्चअखेरपर्यंत शास्तीमाफी योजना लागू होती. या काळातही अनेक जणांना या योजनेचा लाभ घेता आला नाही. त्यामुळे राष्ट्रीय लोकअदालतीच्या निमित्ताने पुन्हा एक दिवस शंभर टक्के शास्तीमाफीची संधी चालून आली आहे. त्याचा किती थकबाकीदार लाभ घेतात, याकडे लक्ष असणार आहे.

Dhule Municipal Corporation
Dhule Municipality News : धुळ्यातील धोकादायक इमारती रिकाम्या करा : आयुक्त दगडे- पाटील

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.