Dhule News : साक्रीत प्रक्रिया उद्योगांची गरज; तालुक्यातील डाळिंब, सीताफळ, तांदूळ, नागली दर्जेदार

Agriculture News : फळ आणि भाजीपाला पिके घेत शेतकऱ्यांनी आधुनिकतेची कास धरत नवनवीन प्रयोग करत कृषी विस्तारातून समृद्धी शोधल्याचे चित्र आहे.
Food Processing Industry
Food Processing Industryesakal
Updated on

म्हसदी : यंदा चांगला पाऊस होण्याचे संकेत वेधशाळेने वर्तविल्याने बळीराजाच्या शेतीविषयी अपेक्षा वाढल्या आहेत. साक्री तालुक्यात पारंपारिक शेतीऐवजी आधुनिक शेतीकडे शेतकरी वळले आहेत. फळ आणि भाजीपाला पिके घेत शेतकऱ्यांनी आधुनिकतेची कास धरत नवनवीन प्रयोग करत कृषी विस्तारातून समृद्धी शोधल्याचे चित्र आहे. शेती‌ व्यवसायाची प्रगती पाहता साक्री तालुक्यात शेतमालावर प्रक्रिया उद्योगांची गरज निर्माण झाली आहे. (Dhule Need for active processing industries)

साक्रीत शीतगृह आवश्यक

साक्री तालुक्यात सर्वच पिके घेतली जातात. अनेकदा ‘पिकवणे सोपे, परंतु विकणे’ अवघड अशी स्थिती शेतकऱ्यांवर येते. डाळिंब, सीताफळ, पपईसह पिंपळनेरच्या पश्चिम पट्ट्यात पिकवल्या जाणाऱ्या तांदूळ, नागली पिकावर प्रक्रिया उद्योग उभारल्यास स्थानिक ठिकाणी रोजगाराची संधी उपलब्ध होऊन शेती मालालाही अपेक्षित दर मिळणार आहे.

साक्री तालुक्यात दर्जेदार डाळिंब घेतला जातो. साक्री तालुक्याच्या डाळिंबाने परदेशात भुरळ घातली आहे. तालुक्यातील डाळिंब नाशिक येथील शीतगृहात पॅकिंग केला जातो. तालुक्यातील डाळिंब, सीताफळ फळ पिकाच्या पॅकिंगसाठी साक्री शहरात शीतगृह असणे आवश्यक आहे.

स्थानिकांना रोजगार मिळणार

पिंपळनेरच्या पश्चिम पट्ट्यात उच्च दर्जाचा तांदूळ, नागली पिकवली जाते. कष्टाने पिकविलेला तांदूळ शेतकरी हमी भावाने विकू शकत नाही. परंतु काही चतुर व्यापारी नकली तांदूळ विक्रीसाठी पटाईत असल्याचे बोलले जाते. साक्री तालुक्यात सुमारे एक लाख पंचेचाळीस हजार चारशे पंचावन्न हेक्टर क्षेत्र लागवडीसाठी योग्य आहे.

गेल्या दहा वर्षांपासून तालुक्यातील सोळा गाव काटवान भागात डाळिंब, सीताफळ, पपई, टरबूज, खरबूज आदी फळ पिके घेतली जात आहेत. फळ शेतीने शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी हातभार लावला आहे. डाळिंबांचे वाढते उत्पादन लक्षात घेता डाळिंबापासून सरबत, ज्यूस, स्नॅक्स आदी पेये तयार केले जाऊ शकतात. त्यातून स्थानिकांना रोजगार मिळणार आहे. (latest marathi news)

Food Processing Industry
Nashik Agriculture News : मालेगाव तालुक्यात पेरणीयोग्य पाऊस! दमदार पावसाची मात्र प्रतीक्षा

तांदूळ निर्यातीतून प्रगती

पश्चिम पट्ट्यात चांगल्या दर्जाचा तांदूळ पिकवण्याचे कसब शेतकऱ्यांमध्ये आहे. बासमती, चिमणसाळ, दोडक्या, इंद्रायणी, सुकवेल, कोलम यासारखे वीस पेक्षा अधिक प्रकार आहेत. स्थानिक ठिकाणी चांगली दर्जेदार वस्तू तयार केली जाते.

डाळिंबासह तांदूळ, नागली, गहू व कडधान्ये पिकांची निर्यात वाढली तर प्रत्येक शेतकऱ्याची प्रगती होईल. पिंपळनेरच्या पश्चिम पट्ट्यात प्रामुख्याने भात, नागली आदी प्रमुख पिके घेतली जातात. त्या भागातील जमीन भात, नागलीसाठी अनुकूल आहे. पारंपारिक पिकांना छेद देऊन तंत्रशुद्ध पद्धतीने शेती करण्याचा कल वाढला आहे.

ऊस क्षेत्रात घट

पाण्याअभावी उसाचे क्षेत्र घटले आहे. तालुक्यातील एकमेव असलेला पांझरा-कान सहकारी साखर कारखाना बंद पडला आहे. कासारे, मालपूर, धाडणे, नवडणे, पिंपळनेर, सामोडे, जेबापूर, पिंपळनेर आदी भागांत अल्प प्रमाणात ऊस लागवड होते. ऊस तोडणीसाठी परजिल्ह्यातील कारखान्यांना शेतकरी गळ घालतो. आजही तालुक्यात उसाचे क्षेत्र वाढू शकते. दुसरीकडे पांझरा-कान सहकारी साखर कारखाना कधी सुरू होईल, हा खरा प्रश्न आहे.

Food Processing Industry
Indian Constitution: शाहू महाराजांनी केलेल्या कायद्यांचे भारतीय संविधानात प्रतिबिंब; माजी सनदी अधिकाऱ्यांचे मत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.