Dhule Municipality News : महापालिकेच्या ताफ्यात नवीन रुग्णवाहिका! जिल्हास्तर नगरोत्थान योजनेतून खरेदी

Dhule News : महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान महाअभियान जिल्हास्तर योजनेतून धुळे महापालिकेने दोन अद्ययावत रुग्णवाहिका घेण्याचा निर्णय घेतला.
Commissioner Amita Dagade-Patil on the occasion of worshipping the new ambulance purchased by the Municipal Corporation.
Commissioner Amita Dagade-Patil on the occasion of worshipping the new ambulance purchased by the Municipal Corporation.esakal
Updated on

Dhule News : महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान महाअभियान जिल्हास्तर योजनेतून धुळे महापालिकेने दोन अद्ययावत रुग्णवाहिका घेण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार प्रथम बी-टाइप रुग्णवाहिकेची खरेदी करण्यात आली असून, ही रुग्णवाहिका मनपाच्या वाहन ताफ्यात दाखल झाली. या रुग्णवाहिकेचे सोमवारी (ता. २२) मनपा आयुक्त तथा प्रशासक अमिता दगडे-पाटील यांच्या हस्ते पूजन झाले. (new ambulance in municipal fleet)

महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान जिल्हास्तर योजनेंतर्गत २०२१-२२ या वर्षासाठी धुळे महापालिकेला रुग्णवाहिका खरेदीसाठी ६७ लाख ५० हजार रुपये निधीस मान्यता मिळाली होती. यात ३० टक्के महापालिकेचा हिस्सा आहे. धुळे शहरातील नागरिकांची मागणी व सर्वसामान्य जनतेचा विचार करता हा प्रस्ताव तयार करण्यात आलेला होता.

प्रस्तावात प्रथमतः एक रुग्णवाहिका घेण्याचे निश्‍चित झाले; परंतु तेवढ्याच मंजूर रकमेतून दोन अद्ययावत रुग्णवाहिका घेण्याबाबत आयुक्‍त तथा प्रशासक श्रीमती दगडे-पाटील यांनी प्रस्ताव सादर करण्याबाबत कळविले. त्यानुसार सद्यःस्थितीत जीईएम पोर्टलद्वारे फोर्स मोटर्स लिमिटेड कंपनीकडून बी-टाइप रुग्णवाहिका खरेदी करण्यात आली. (latest marathi news)

Commissioner Amita Dagade-Patil on the occasion of worshipping the new ambulance purchased by the Municipal Corporation.
Dhule Flood Damaged : दोंडाईचात पूरग्रस्तांना आर्थिक मदतीचे वाटप आमदार रावल यांच्याकडून दिलासा

१७ लाख ३६६ रुपये खर्चातून ही अद्ययावत सोयी-सुविधांनीयुक्त रुग्णवाहिका असल्याचे महापालिकेने म्हटले आहे. खरेदी केलेली नवीन रुग्णवाहिका धुळे महापालिकेच्या वाहन ताफ्यात दाखल झाली. या रुग्णवाहिकेचे सोमवारी आयुक्‍त तथा प्रशासक श्रीमती दगडे-पाटील यांच्या हस्ते पूजन करण्यात आले.

अतिरिक्त आयुक्त करुणा डहाळे, उपायुक्त डॉ. संगीता नांदूरकर, उपायुक्त शोभा बाविस्कर, उपायुक्त हेमंत निकम, सहाय्यक आयुक्त समीर शेख, भांडारपाल राजेंद्र माईनकर तसेच माजी नगरसेवक मुजफ्फर हुसेन, मुख्य स्वच्छता निरीक्षक राजेश वसावे व इतर अधिकारी उपस्थित होते. दरम्यान, डी-टाइप कार्डियाक ॲम्ब्युलन्स खरेदीसाठी महापालिकेकडून निविदा प्रसिद्धीची कार्यवाही सुरू आहे.

Commissioner Amita Dagade-Patil on the occasion of worshipping the new ambulance purchased by the Municipal Corporation.
Dhule News : सीईओ नरवाडे यांच्याकडे जिल्हाधिकारीपदाचा कार्यभार!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()