चिमठाणे : चिमठाणे (ता. शिंदखेडा) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत २५ गावे असून, ४४ हजार ३४४ एवढी लोकसंख्या आहे. चार वैद्यकीय अधिकारी असून, समुदाय वैद्यकीय अधिकारी (सीएचओ) सकाळी दहाच्या सुमारास रुग्णांवर उपचार करतात. प्राथमिक आरोग्य केंद्राला कोणी वाली आहे का, असा प्रश्न रुग्णांनी उपस्थित केला आहे. (Dhule News 25 villages of Chimthane Primary Health Center on Saline)
साक्री-शिंदखेडा राज्य मार्ग बारा व सोनगीर-दोंडाईचा राज्य महामार्ग एकवर चिमठाणे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. राज्य महामार्ग व राज्य मार्ग असल्याने वाहन अपघाताचे प्रमाण जास्त असल्याने येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्ण येतात. मात्र वैद्यकीय अधिकारी नसल्याने रुग्णांना शिंदखेडा येथील ग्रामीण रुग्णालयात किंवा धुळे जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी जावे लागते.
चार वैद्यकीय अधिकारी पण...
प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी म्हणून डॉ. तृष्णा वाघ व डॉ. प्रतीक पाटील कार्यरत आहेत. तसेच दोंडाईचा येथील बाळासाहेब ठाकरे ‘आपला दवाखाना’ वैद्यकीय अधिकारी डॉ. रीतिका आहिरराव व शिंदखेडा येथील बाळासाहेब ठाकरे ‘आपला दवाखाना’ वैद्यकीय अधिकारी डॉ. सोनल जाधव यांना देण्यात आला आहे. शिंदखेडा व दोंडाईचा येथे ‘आपला दवाखाना’ कार्यरत होत नाही तोपर्यंत चिमठाणे प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत राहणार आहे. (latest marathi news)
चिमठाणे प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत चिमठाणेसह अमराळे, चिरणे-कदाणे, तामथरे व शेवाडे येथील उपकेंद्रांचा समावेश होतो. प्रत्येक उपकेंद्र येथे समुदाय आरोग्य अधिकारी (सीएचओ) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शनिवारी (ता. ६) सकाळी दहाच्या सुमारास अमराळे उपकेंद्राच्या सीएचओ डॉ. पूनम वाघ यांनी ओपीडी रुग्णांची तपासणी केली. वैद्यकीय अधिकारी येत नसल्याने सीएचओ रुग्णांवर उपचार करतात.
"चिमठाणे प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. तृष्णा वाघ व डॉ. प्रतीक पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. चार वैद्यकीय अधिकारी असून, सीएचओ हे ओपीडी रुग्णांची तपासणी करीत असतील, तर ही गंभीर बाब आहे. चौकशी करून योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल."-डॉ. रमाकांत पाटील, तालुका वैद्यकीय अधिकारी, शिंदखेडा
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.