Dhule Lok Sabha Election : धुळे लोकसभेतील चुरस अधिक वाढणार

Dhule Lok Sabha Election : लोकसभा निवडणूक जाहीर होण्याची अर्थात आचारसंहिता मार्चच्या पहिल्या आठवड्यात घोषित होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
Lok Sabha Election 2024
Lok Sabha Election 2024esakal
Updated on

Dhule Lok Sabha Election : लोकसभा निवडणूक जाहीर होण्याची अर्थात आचारसंहिता मार्चच्या पहिल्या आठवड्यात घोषित होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे आता सत्ताधारी पक्षाकडून उमेदवारांची अंतिम पडताळणी सुरु झालेली आहे. धुळे लोकसभा मतदार संघामध्ये उमेदवारीसाठी चुरस अधिक वाढल्याची चिन्हे दिसत आहेत. (Dhule competition for Lok Sabha candidate will increase)

विद्यमान खासदार डॉ. सुभाष भामरे हे उमेदवारीची खात्री बाळगून आहेत. गेली दोन टर्म डॉ. भामरे हे खासदार आहेत. या काळात त्यांच्याकडे संरक्षण राज्यमंत्री पदाची जबाबदारीही देण्यात आली होती. डॉ. भामरे यांच्या संदर्भात पक्ष काय निर्णय घेणार हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होणार आहे. धुळे लोकसभा मतदार संघात मात्र उमेदवारीची चुरस निर्माण झालेली आहे.

जिल्हा परिषदेचे कृषी सभापती हर्षवर्धन दहिते यांचे नाव उमेदवारीसाठी सध्या चर्चेत आहे. दहिते यांनी गेल्या काही महिन्यांपासून लोकसभा क्षेत्र पिंजून काढले आहे. भाजपसाठी अत्यंत महत्त्वाच्या ठरलेल्या रामजन्मभूमी प्रतिकृतीची रथयात्रा कमालीची चर्चेत राहिली.

विशेष म्हणजे ही यात्रा अजूनही सुरु आहे. गावागावांमध्ये यात्रेला प्रतिसाद मिळत आहे. तरुण चेहरा असल्याने संघ परिवारातील तसेच भाजपतील प्रमुख नेत्यांचे लक्ष दहिते यांनी वेधून घेतले आहे. भाजपचा हिंदुत्त्वाचा अजेंडा पुढे नेण्यात दहिते सध्या आघाडीवर आहेत.

Lok Sabha Election 2024
Dhule News : चिंचवार येथे तीव्र पाणीटंचाई

काँग्रेसतर्फे निवृत्त अधिकारी अब्दुल रहेमान यांच्या नावाची चर्चा सुरु असताना निवृत्त पोलिस अधिकारी प्रताप दिघावकर यांची भाजपकडून चाचपणी सुरु झाली. धुळे लोकसभा मतदार संघात आजवर प्रतापदादा सोनवणे वगळता अन्य कोणालाही धुळे लोकसभेत मतदारांनी स्वीकारलेले नाही, ही वस्तुस्थिती आहे.

उमेदवारी ठरवताना वयाची मर्यादा हा निकषही महत्त्वाचा ठरणार आहे. काँग्रेसचा उमेदवार कोण असेल, हे पाहणेही इथे महत्त्वाचे ठरणार आहे. त्यासोबतच एमआयएम देखील धुळे लोकसभा मतदार संघात उमेदवार देण्याची दाट शक्यता आहे. धुळे शहर आणि मालेगाव शहरात एमआयएमचे आमदार असल्याने पक्षाला इथे लोकसभेसाठी संधी असल्याचे दिसत आहे.

Lok Sabha Election 2024
Dhule News : सरकारी धोरणांविरुद्ध कामगार एकवटले; धुळ्यात मोर्चातून निषेध

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.