Dhule News : केंद्र शासनाच्या धोरणाविरूद्ध सरकारी कर्मचाऱ्यांची निदर्शने

केंद्र शासनाच्या धोरणाविरूद्ध कामगार संघटनांनी देशव्यापी संप पुकारला आहे.
Government employees' unions protesting against government policies.
Government employees' unions protesting against government policies.esakal
Updated on

Dhule News : केंद्र शासनाच्या धोरणाविरूद्ध कामगार संघटनांनी देशव्यापी संप पुकारला आहे. या संपाच्या समर्थनार्थ येथे सकाळच्या सत्रात राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी एक तास वॉकआऊट करीत केंद्र सरकारच्या धोरणाविरोधात तीव्र निदर्शने केली. जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या नेतृत्वात शुक्रवारी (ता.१६) आंदोलन झाले. (Demonstrations by government employees against policies of central government)

Government employees' unions protesting against government policies.
Dhule News : दुसाणे बसस्थानक परिसरातील अतिक्रमण जमीनदोस्त; 60 वर्षांपासूनचा प्रलंबित प्रश्न निकाली

जुनी पेन्शन योजना लागू करावी. कोरोना काळातील १८ महिन्यांचा महागाई भत्ता अदा करावा. खासगीकरण व कंत्राटीकरण पद्धत बंद करावी.

आठवा वेतन आयोग लागू करण्यासह इतर मागण्यांसाठी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी आपापल्या कार्यालयात सकाळच्या सत्रात वॉकआऊटव्दारे निदर्शने केली.

जिल्हा राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. संजय पाटील, जिल्हाध्यक्ष अशोक चौधरी, कोषाध्यक्ष सुधीर पोद्दार, उपाध्यक्ष सुरेश पाईकराव, कार्याध्यक्ष राजेंद्र माळी, ज्येष्ठ मार्गदर्शक एस. यु. तायडे आदी पदाधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

Government employees' unions protesting against government policies.
Dhule News : सरकारी धोरणांविरुद्ध कामगार एकवटले; धुळ्यात मोर्चातून निषेध

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.