भटाणे (जि. धुळे) : कंत्राटी कामगाराचे आकृतिबंधामध्ये समायोजन करण्यात यावे, पश्चिम बंगालच्या धर्तीवर मानधन देण्यात यावे, कंत्राटी कर्मचाऱ्यांना राज्य निधी असोसिएशनमध्ये नियुक्ती देण्यात यावी,
ग्रामरोजगार सेवकांच्या प्रलंबित मागण्या पूर्ण करण्यात याव्यात, मध्य प्रदेश शासनाप्रमाणे ६२ वर्षे वयापर्यंत नोकरीची हमी देण्यात यावी, या मागणीकरिता रोजगार हमी योजनेतील कंत्राटी कर्मचारी बेमुदत संपावर गेले आहेत. (Dhule News Employment Guarantee Contract Strike of employees)
हेही वाचा : T+1 Settlement मुळे वाढेल शेअर बाजारातली उलाढाल
शिरपूरचे तहसीलदार आबा महाजन, गटविकास अधिकारी संजय सोनवणे यांना संघटनेतर्फे निवेदन देण्यात आले. निवेदनाचा आशय असा ः महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत कार्यरत कंत्राटी तत्त्वावर कार्यरत कर्मचारी दहा ते बारा वर्षांपासून अखंडित कामे करीत आहेत. वेळोवेळी वरिष्ठांनी दिलेली जबाबदारी व्यवस्थितपणे पार केली आहे.
कोविड-१९ च्या महामारीच्या काळातही शासनाकडून कोणतीही सुविधा नसताना रोजगार हमी योजनेंतर्गत गावातील प्रत्येक मजुरांना फार मोठ्या प्रमाणात कामे उपलब्ध करून रोजगार दिला आहे.
असे असताना तीन-चार वर्षांपासून आम्हा कंत्राटी कर्मचाऱ्यांना कोणतेही मानधन वाढविण्यात आलेले नाही.एपीओ एम. एस. देवरे, एपीओ महेंद्र धनगर, व्ही. एच. थोरात, एस. पी. मोरे, आय. यू. पावरा, तांत्रिक अधिकारी प्रफुल्ल पाटील, एम. आर. पवार, एस. आर. पवार, ए. पी. पाटील, ए. एस. पाटील, शशिकांत बेलदार यांनी दिले आहे.
कामबंदमुळे मजुरांची उपासमारी
महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेतून ग्रामीण भागातून शेतकरी शेतमजुरांच्या वैयक्तिक व सार्वजनिक लाभाची कामे होत असतात.
त्यात फळबाग, वैयक्तिक शौचालय, शेततळे, रोपवाटिका, घरकुल योजना, शोषखड्डा, गोठा, नाडेप डेपो, गांडूळखत डेपो, कुक्कुटपालन, सिंचन विहीर, शेळी गोठा या वैयक्तिक लाभाबरोबरच, शिवाररस्ते, सार्वजनिक शौचालय, विहीर पुनर्भरण, पाणलोट यांसारख्या विविध कामे रोजगार हमी योजनेतून होत असतात.
त्यात या वर्षापासून शासनाने मी समृद्ध तर गाव समृद्ध योजनेतून रोजगार हमी योजनेच्या कामाला गती दिली आहे. महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेत कामासाठी मजुरांचे एक आठवड्याचे मस्टर काढण्यात येते.
कंत्राटी कर्मचाऱ्यांनी कामबंदची पुकार दिल्याने या संपूर्ण आठवड्याचे मस्टर मागणी न झाल्यामुळे काम बंद झाल्याने कामावर जाणाऱ्या मजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.