Dhule News : तिरूपतीनगरात रस्ता, गटारीचे काम : आमदार फारूक शाह

Dhule : शहरातील प्रभाग क्रमांक दोनमधील नागरिकांच्या मागणीनुसार तिरुपतीनगरात गटार व रस्ता काँक्रिटीकरणाच्या कामाचे आमदार फारूक शाह यांच्या हस्ते भूमिपूजन झाले.
Farooq Shah performing Bhoomi Puja for development work in Tirupatinagar Dhule.
Farooq Shah performing Bhoomi Puja for development work in Tirupatinagar Dhule. esakal
Updated on

Dhule News : शहरातील प्रभाग क्रमांक दोनमधील नागरिकांच्या मागणीनुसार तिरुपतीनगरात गटार व रस्ता काँक्रिटीकरणाच्या कामाचे आमदार फारूक शाह यांच्या हस्ते भूमिपूजन झाले. याकामी महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान महाअभियानांतर्गत ४२ लाखांचा निधी खर्च होणार आहे, अशी माहिती आमदारांनी दिली. (Dhule MLA Farooq Shah performed Bhoomi Pujan for sewerage and road concreting works in Tirupati Nagar)

नासिर पठाण, नगरसेवक सईद बेग, डॉ. दीपश्री नाईक, लोकक्रांती सेनेचे देवेंद्र पाटील, के. एन. बिरारी, तेजस पाटील, प्यारेलाल पिंजारी, ललित पाटील, संजय पाटील, दिनेश चव्हाण, शिवाजी पाटील, कैलास पाटील, संतोष खैरनार, भरत पवार, रघुनाथ बोरसे, दिलीप बाविस्कर, आत्माराम पाटील, सुभाष चौधरी.

भटू पाटील, शरद सोनवणे, दर्शन बाविस्कर, प्रमोद मोरे, जयवंत सैंदाणे, दिलीप पाटील, कैलास पाटील, डॉ. बापूराव पवार, अभियंता नकुल अहिरराव, मदन कापुरे, नजर पठाण, कैसर अहमद आदी उपस्थित होते.

Farooq Shah performing Bhoomi Puja for development work in Tirupatinagar Dhule.
Dhule News : बालस्नेही पोलिस ठाण्याचे उद्‌घाटन; जिल्ह्यात पहिले

भाजपवर टीकाटिप्पणी

आमदार शाह म्हणाले, की महापालिकेतील सत्ताधाऱ्यांच्या नियोजनशून्यतेमुळे देवपूरचे खड्डेपूर झाले. देवपूरवासीयांना त्याचा त्रास सहन करावा लागला. अपघातामुळे अनेकांना गंभीर इजा झाली. वस्तुतः भूमिगत गटार योजना आणि पाणीपुरवठा योजना राबविताना होणाऱ्या खड्ड्यांचा नागरिकांना त्रास होणार नाही यासाठी चारी दुरुस्ती, रस्ते दुरुस्ती अथवा नूतनीकरणाचे नियोजन करणे आवश्यक होते.

मात्र, सताधाऱ्यांच्या नियोजनशून्यतेमुळे हे काम शक्य झाल्याचे दिसत नाही. देवपूरवासीयांची ही समस्या लक्षात घेत नगरोत्थान महाआभियान, मूलभूत सोयी-सुविधांचा विकासअंतर्गत प्रभाग क्रमांक १, २, ३, ४, ५ मध्ये सुमारे २० कोटींच्या निधीतून कामे मंजूर करून आणली.

मात्र ‘मी पण करणार नाही आणि इतरांनाही करू देणार नाही’ या उक्तीप्रमाणे सत्ताधाऱ्यांनी अशा विकासकामात खोडा घातला. तरीही रद्द केलेली विकासकामे पुन्हा मंजूर करून आणली, असे आमदार शाह यांनी भाजपवर टीका करताना सांगितले.

Farooq Shah performing Bhoomi Puja for development work in Tirupatinagar Dhule.
Dhule News : शिरपूरला जिल्हा परिषदेच्या शाळांचे तीन तेरा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.