Dhule Municipality News : ‘स्थायी’त 33 कोटींवर खर्चाची निविदा मंजूर

Dhule Municipality News : महापालिका स्थायी समितीची साप्ताहिक सभा गुरुवारी (ता. १५) सकाळी साडेअकराला झाली.
Dhule Municipal Corporation
Dhule Municipal Corporation esakal
Updated on

Dhule News : केंद्र व राज्य शासन पुरस्कृत अमृत-२.० अंतर्गत येथील पाणीपुरवठा योजनेवरील वीज व यांत्रिकी कामासाठी २९ कोटींच्या निविदेसह मनपा ऊर्दू शाळा क्रमांक २५ येथे सभागृह, ग्रंथालय बांधणे, प्रभाग १६ मध्ये गटारीचे काम, प्रभाग १८ मधील भाईजीनगर येथील ओपन स्पेसला संरक्षक भिंत बांधणे आदी सुमारे ३३ कोटींच्या खर्चाची निविदा स्थायी समितीने मंजूर केली.

महापालिका स्थायी समितीची साप्ताहिक सभा गुरुवारी (ता. १५) सकाळी साडेअकराला झाली. आयुक्त तथा प्रशासक अमिता दगडे-पाटील, नगरसचिव मनोज वाघ, अन्य अधिकारी उपस्थित होते. (Dhule municipal standing committee approved tender)

प्रशासकांच्या कार्यकाळातील पाचव्या स्थायी समितीच्या अजेंड्यावर विविध योजनांची कामे होती. यात प्रामुख्याने अमृत-२.० अंतर्गत धुळे पाणीपुरवठा योजनेवरील विद्युत व यांत्रिकी कामासाठी प्राप्त निविदांवर निर्णय घेण्याचा विषय होता.

११८.१४ कोटींपैकी विद्युत व यांत्रिकी कामासाठी २९.७६ कोटींची निविदा प्रसिद्ध करण्यात आली होती. या प्रक्रियेत मे. बडगुजर ॲन्ड कंपनी नाशिक, मे. फ्रेंड्स इंजिनिअरिंग कॉर्पोरेशन, नवी मुंबई व सुहास इलेक्ट्रिकल्स, ठाणे अशा तीन निविदा प्राप्त झाल्या.

यातील मे. बडगुजर ॲन्ड कंपनी नाशिक यांची शेकडा ११.९६ टक्के जादा दराची सर्वांत कमीने निविदा होती. त्यावर स्थायीत चर्चा झाली. वाटाघाटीअंती कंपनीने ०.१० टक्के दर कमी करत ११.८६ टक्के जादा दराने काम करण्याची तयारी दर्शविल्याचे स्थायीत स्पष्ट करण्यात आले. दरम्यान, हा विषय शासनाच्या संबंधित वरिष्ठ पातळीवर पाठवून अंतिम मान्यता घेण्याची शिफारस करत मंजूर करण्यात आला.

Dhule Municipal Corporation
Dhule News : शिंदखेडा येथील भाजी मंडईचा तिढा कायम; बैठकीत ठोस निर्णय नाही

सभागृह, संरक्षक भिंत

शंभर टक्के शासन अनुदानाच्या मूलभूत सेवा-सुविधांचा विकास योजना २०२३-२४ अंतर्गत प्रभाग ८ मधील ऊर्दू शाळा क्रमांक २५ च्या प्रांगणात विद्यार्थ्यांसाठी विविध उपयोगी सभागृह बांधण्यासाठी दोन कोटी २८ लाख ४९५ रुपये किमतीची अंदाजपत्रकीय दराची रिजवान अहमद युसूफ पटेल यांची निविदा मंजूर करण्यात आली.

तसेच याच योजनेंतर्गत प्रभाग १६ मधील कुणाल हाउसिंग सोसायटी गटार कामासाठी २९ लाख ९४ हजार १०३ रुपये खर्चाची निविदा मंजूर करण्यात आली. या कामासाठी खालिद शेख यांची अंदाजपत्रकीय दराची निविदा होती, त्यामुळे त्यांना हे काम देण्यात आले.

तसेच प्रभाग १८ मधील सर्व्हे नंबर ५२६ मधील भाईजीनगर येथे ओपन स्पेसला संरक्षक भिंत बांधण्यासाठी एसडीएम डेव्हलपर्स ॲन्ड इन्फ्रा यांची अंदाजपत्रकीय दराची निविदा मंजूर करण्यात आली. ९९ लाख ९८ हजार ९९७ रुपये खर्चाचे हे काम आहे.

Dhule Municipal Corporation
Dhule News : धुळे जिल्ह्यातून 23 हजारांवर ना हरकती; मराठा आरक्षणाचा प्रश्‍न

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()