Dhule News : चिंचवार येथे तीव्र पाणीटंचाई

Dhule : चिंचवार, ता. धुळे येथील पाणी टंचाई दूर करण्यासाठी अक्कलपाडा डावा कालव्याचे पाणी चिरक्यावड धरणात सोडण्याची मागणी माजी सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
Villagers of Chinchwar giving a statement to the District Collector demanding to remove water shortage.
Villagers of Chinchwar giving a statement to the District Collector demanding to remove water shortage.esakal
Updated on

Dhule News : चिंचवार, ता. धुळे येथील पाणी टंचाई दूर करण्यासाठी अक्कलपाडा डावा कालव्याचे पाणी चिरक्यावड धरणात सोडण्याची मागणी माजी सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. चिंचवार येथे फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापासूनच तीव्र पाणीटंचाई जाणवत आहे. (dhule Severe water shortage in Chinchwar)

Villagers of Chinchwar giving a statement to the District Collector demanding to remove water shortage.
Dhule News : सरपंचासह 158 कुटुंबे घेणार जलसमाधी

नाथरीपाडाजवळील चिरक्यावड धरणाच्या पायथ्याशी विहीर खोदून गावाला नळाद्वारे पाणी पुरवठा होतो. मात्र दुष्काळामुळे हे धरण कोरडे पडले आहे. परिणामी विहिरीची पाण्याची पातळी खालावली असून पाणीपुरवठा योजना कोलमडली आहे.

त्यामुळे महिलांना पाण्यासाठी वणवण फिरावे लागत असून गुरांचे हाल होत आहेत. म्हणून अक्कलपाडा प्रकल्पाच्या डाव्या कालव्याचे पाणी चिरक्यावड धरणात टाकावे, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.

यावेळी माजी सरपंच सोमनाथ पाटील, ग्रामपंचायत सदस्य दाजभाऊ पाटील, रहीम पटेल आदी उपस्थित होते.

Villagers of Chinchwar giving a statement to the District Collector demanding to remove water shortage.
Dhule News : सरकारी धोरणांविरुद्ध कामगार एकवटले; धुळ्यात मोर्चातून निषेध

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.