HSC Exam 2024 : बारावी परीक्षेसाठी प्रवेशबंदी आदेश

HSC Exam 2024 : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे बुधवार (ता. २१)पासून बारावीची परीक्षा सुरू होणार आहे. ती २१ मार्चपर्यंत चालेल.
HSC Exam
HSC Exam esakal
Updated on

Dhule News : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे बुधवार (ता. २१)पासून बारावीची परीक्षा सुरू होणार आहे. ती २१ मार्चपर्यंत चालेल. तसेच १ मार्चपासून ते २६ मार्चपर्यंत दहावीची परीक्षा चालेल.

या परीक्षा केंद्राच्या ठिकाणी गैरप्रकार होऊ नये व त्या ठिकाणी शांतता व सुव्यवस्थेस बाधा निर्माण होऊ नये, यासाठी खबरदारीचे उपाय म्हणून प्रातांधिकारी राहुल जाधव यांनी तरतुदीनुसार परीक्षा केंद्राच्या दोनशे मीटर परिसरात प्रवेशबंदीचा आदेश दिला आहे. (12th examination start from today)

HSC Exam
HSC Exam 2024 : बारावीचा आजपासून परीक्षारंभ; विद्यार्थी सज्‍ज

केंद्रावर बारावी, दहावीच्या परीक्षेवेळी सकाळी आठपासून सायंकाळी साडेसहापर्यंत कोणीही प्रवेश करू नये. जाहीर आदेश परीक्षार्थी, नियुक्त कर्मचारी, अधिकारी, पोलिस, होमगार्ड यांना लागू होणार नाही.

कोणतेही शस्त्र बाळगता येणार नाही किंवा शारीरिक दुखापती, इजा होईल अशी कोणतीही वस्तू बरोबर नेता येणार नाही. केंद्राच्या दोनशे मीटर परिसरातील सर्व सार्वजनिक टेलिफोन, एसटीडी.

आयएसडी, फॅक्स केंद्र, झेरॉक्स दुकाने, इंटरनेट सुविधा व ध्वनिक्षेपक परीक्षेवेळी बंद ठेवावे. परीक्षार्थींना मोबाईल, लॅपटॉप, पेजर, गणकयंत्राचा वापर करता येणार नाही, असाही आदेश आहे.

HSC Exam
HSC Examination: तुमच्याही मुलांची HSC परीक्षा आहे? 'या' गोष्टींचं करा पालन, मुलं राहतील 'टेन्शन फ्री'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.