Niti-Aayog Poverty Index : नीती आयोगाने देशभरात केलेल्या (२०२३) सर्वेक्षणातून गरिबी निर्देशांक अहवाल प्रसिद्ध केला. यात महाराष्ट्रामध्ये नंदुरबार जिल्ह्यात सर्वाधिक गरीब नागरिक असल्याचे समोर आले आहे. या जिल्ह्यात ३३.१७ टक्के नागरिक गरिबीत जीवन जगत आहेत. त्यापाठोपाठ धुळे जिल्ह्याचा दुसरा क्रमांक लागतो. जिल्ह्यातील २१.४४ टक्के नागरिक गरीब असल्याचा निष्कर्ष अहवालात काढण्यात आला आहे. (Nandurbar district recorded highest number of poor citizens )
नीती आयोगाच्या सर्वेक्षणानुसार नाशिक जिल्हा राज्यात सहाव्या स्थानी (१३.४६ टक्के), तर जळगाव सातव्या (१३.३९ टक्के) क्रमांकावर आहे. नीती आयोग नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया ही केंद्र सरकारची विकास धोरण ठरवणारी शिखर संस्था आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून नीती आयोगाची स्थापना झाली. (latest marathi news)
राज्य शासनाच्या अर्थ व सांख्यिकी संचालनालयाने नुकत्याच जाहीर केलेल्या २०२२-२०२३ या वर्षाच्या आर्थिक पाहणी अहवालाचा आधार जर घेतला तर परभणी जिल्ह्याचे वास्तविक स्थूल जिल्हा उत्पन्न हे प्रतिदिन सरासरी ३०० रुपये इतके आहे. त्यामुळे या पैशांत खायचे काय, जगायचे कसे? त्याखेरीज मुलांचे शिक्षण कसे करायचे आदी प्रश्न नागरिकांसमोर उभे ठाकतात.
उत्तर महाराष्ट्रातील गरीब जिल्हे
(टक्केवारीप्रमाणे क्रम)
* नंदुरबार : ३३.१७ (प्रथम)
* धुळे : २१.४४ (द्वितीय)
* नाशिक : १३.४६ (सहावा)
* जळगाव : १३.३९ (सातवा)
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.