Dhule News : कुठेही अनुचित प्रकाराची नोंद नाही : अभिनव गोयल; धुळे लोकसभेसाठी मतदानाची शांततेत प्रक्रिया

Dhule News : पोलिस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवल्याने लोकसभा मतदारसंघात कुठेही अनुचित प्रकार घडल्याची नोंद नाही, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अभिनव गोयल यांनी दिली.
Abhinav Goel
Abhinav Goelesakal
Updated on

Dhule News : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील धुळे लोकसभा मतदारसंघाच्या मतदानाला सोमवारी (ता. २०) सकाळी सातपासून उत्साहात सुरवात झाली. यात एकूण सहा विधानसभा मतदारसंघांत सायंकाळी पाचपर्यंत अंदाजे सरासरी ४८.८१ टक्के मतदान झाले, तर पोलिस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवल्याने लोकसभा मतदारसंघात कुठेही अनुचित प्रकार घडल्याची नोंद नाही, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अभिनव गोयल यांनी दिली. (Dhule Polling for Dhule Lok Sabha held peacefully)

धुळे लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघनिहाय सायंकाळी पाचपर्यंत झालेले मतदान (टक्क्यांत) असे ः धुळे ग्रामीण- ५०.३१ टक्के, धुळे शहर- ४६.१६ टक्के, शिंदखेडा- ४५.८४ टक्के, मालेगाव मध्य- ५७.०२ टक्के, मालेगाव बाह्य- ४७.०० टक्के, बागलाण- ४७.०१ टक्के.

मतदानास सकाळी सुरवात होताच शहरासह ग्रामीण भागातील मतदाराच्या रांगा होत्या. काही मतदान केंद्रांवर सायंकाळी सातपर्यंत मतदान सुरू होते. सहाही विधानसभा मतदारसंघांतील एक हजार ९६९ मतदान केंद्रांवर मतदानासाठी येणाऱ्या मतदारांना कोणत्याही प्रकारच्या अडचणींचा सामना करावा लागू नये यासाठी आवश्यक सोयी-सुविधा होत्या.

त्यात पिण्याचे पाणी, उन्हापासून बचावासाठी मंडप किंवा शेड, मतदार सहाय्य्यता केंद्र, प्रथमोपचार पेट्या, ओआरएसचे पाकीट, आरोग्य केंद्र, अंगणवाडी व बालसंगोपन केंद्र, व्हीलचेअरचा समावेश होता. ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, तृतीयपंथी, युवा, महिला व नागरिकांनी उत्साहात मतदानाचा हक्क बजावला. (latest marathi news)

Abhinav Goel
Dhule Lok Sabha Election: धुळे लोकसभेसाठी 55. 96 टक्के मतदान! मालेगाव मध्यला सर्वाधिक टक्का; भाजप विरुद्ध काँग्रेस चुरशीची लढत

जिल्हाधिकारी गोयल जिल्हाधिकारी कार्यालयात स्थापन वेब कास्टिंगच्या माध्यमामातून ९८६ मतदान केंद्र, मतदान प्रक्रियेवर लक्ष ठेवून होते. जिल्ह्यात मतदान प्रक्रिया सुरळीत व शांततेत पार पडावी यासाठी जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला.

त्यामुळे लोकसभा मतदारसंघात कुठेही अनुचित प्रकार घडल्याची नोंद नाही. निवडणूक पोलिस निरीक्षक किशन सहाय्य, निवडणूक खर्च निरीक्षक व्यंकटेश जाधव यांनी धुळे ग्रामीणमधील रानमळा, मोघण या क्रिटिकल, तर मालेगाव मध्य व बाह्य मतदारसंघातील दाभाडी तसेच गर्दीच्या मतदान केंद्रांना भेट दिली.

Abhinav Goel
Nashik Lok Sabha Election 2024 : नाशिकमध्ये 61 टक्के, तर दिंडोरीत 63 टक्के मतदारांनी बजावला हक्क

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.