Maha Shivratri 2024 : धुळे शिवालयांमध्ये ‘हर हर महादेव’चा जयघोष

Maha Shivratri 2024 : महाशिवरात्रीनिमित्त गुरुवारी (ता. ८) रात्रीपासूनच शहरातील शिवालये ‘हर हर महादेव, बम बम भोले’च्या जयघोषाने दुमदुमून गेली.
occasion of Mahashivratri crowd of devotees gathered to have darshan of Sri Venkateshwar Mahadev on the suspension bridge over Manjira river in the city.
occasion of Mahashivratri crowd of devotees gathered to have darshan of Sri Venkateshwar Mahadev on the suspension bridge over Manjira river in the city.esakal
Updated on

Dhule : महाशिवरात्रीनिमित्त गुरुवारी (ता. ८) रात्रीपासूनच शहरातील शिवालये ‘हर हर महादेव, बम बम भोले’च्या जयघोषाने दुमदुमून गेली. शुक्रवारी (ता. ९) रात्री उशिरापर्यंत विविध धार्मिक कार्यक्रमांनी महाशिवरात्रीचा उत्साह पाहायला मिळाला. भाविकांनी सकाळपासूनच दर्शनासाठी मंदिरांत गर्दी केली होती. भक्तिमय वातावरण व भाविकांच्या गर्दीमुळे शहरातील सर्वच महादेव मंदिर परिसरात चैतन्याचे वातावरण होते. (Dhule occasion of Mahashivratri programs were organized in various Mahadev temples in city)

भाविकांच्या गर्दीने मंदिरांना जत्रेचे स्वरूप आले. पांझरा नदीवरील झुलत्या पुलावरील श्री पांझरेश्‍वर महादेवाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची प्रचंड गर्दी झाल्याचे पाहायला मिळाले. महाशिवरात्रीनिमित्त शहरातील पांझरा नदीच्या झुलत्या पुलावरील पांझरेश्वर महादेव, जमनागिरी रोडवरील प्राचीन महादेव मंदिर, पुरातन पांझरेश्वर महादेव, गुप्तेश्वर महादेव, कैलासनगरातील महादेव मंदिर.

साक्री रोडवरील पद्मनाभनगर महादेव मंदिर, मालेगाव रोडवरील अभयनगरातील श्री ओंकारेश्वर महादेव मंदिर, नागेश्वर महादेव, पंचवटीतील महादेव मंदिर, नगाव (ता. धुळे) येथील श्री ओंकारेश्वर महादेव यासह विविध महादेव मंदिरांमध्ये जप, कीर्तन, शिवपूजन सोहळ्यासह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.

occasion of Mahashivratri crowd of devotees gathered to have darshan of Sri Venkateshwar Mahadev on the suspension bridge over Manjira river in the city.
Dhule News : धुळ्यातील 9 मान्यवरांसह संस्था पुरस्कारांचे ‘मानकरी’; सामाजिक न्याय विभागातर्फे विविध पुरस्कार

महाशिवरात्रीनिमित्त मंदिरांना आकर्षक फुले, भगव्या पताकांनी सजविण्यात आले. शहरातील सर्वच मंदिरांवर आकर्षक रोशणाई करण्यात आली. पहाटे मंदिरामध्ये अभिषेक करण्यात आला. त्यानंतर महादेव पिंडीची विधिवत पूजा करून भाविकांना दर्शनासाठी मंदिरे खुली करण्यात आली.

काही मंदिरांमध्ये शिवलीलामृताचे वाचन झाले. भाविकांनी ओम नमः शिवाय, हर हर महादेव, श्री शिवाय नमस्तुभ्यमचा गजर करत दर्शन घेतले. ठिकठिकाणी भाविकांना साबूदाणा खिचडी, केळी, वेफर्स, राजगिरा लाडू, केळी, फळे व उपवासाच्या पदार्थांचा प्रसादवाटप करण्यात आला.

occasion of Mahashivratri crowd of devotees gathered to have darshan of Sri Venkateshwar Mahadev on the suspension bridge over Manjira river in the city.
Dhule News : जिल्हा रुग्णालयाच्या श्रेणीवर्धनास मंजुरी : आमदार फारूक शाह

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()