Dhule News : जुने ट्रक टर्मिनल ‘धूळखात’! पावणेसात कोटींचे ‘नवे’ मंजूर; पथदीप देखभाल-दुरुस्तीसाठीही नवीन तीन ठेकेदार

Dhule News : आता संबंधित ठेकेदार काम करत नसल्याने पथदीप देखभाल-दुरुस्तीसाठीही नवीन तीन ठेकेदार नियुक्तीसही मंजुरी देण्यात आली.
Commissioner and Administrator Amita Dagde-Patil speaking in Municipal Administrative Standing Committee meeting. Additional Commissioner Karuna Dahale, Municipal Secretary Manoj Wagh and other officials are nearby.
Commissioner and Administrator Amita Dagde-Patil speaking in Municipal Administrative Standing Committee meeting. Additional Commissioner Karuna Dahale, Municipal Secretary Manoj Wagh and other officials are nearby.esakal
Updated on

Dhule News : शंभर टक्के शासन निधीतून दीड-दोन कोटी खर्च करून ट्रक टर्मिनल महापालिकेने उभे केले. हे नवेकोरे ट्रक टर्मिनस कार्यान्वित न झाल्याने ते गेल्या सात वर्षांपासून धूळखात उभे आहे, दुरवस्थेकडे चालले आहे. असे असताना आता पुन्हा शासन निधी मिळाला म्हणून महापालिकेने जुन्या टर्मिनलजवळच नवीन सुमारे पावणेसात कोटी रुपयांच्या नव्या ट्रक टर्मिनलला गुरुवारी (ता. १८) मंजुरी दिली.

तसेच २०१२ मध्ये पथदीपांसाठी १३ कोटी रुपयांचा ठेका देण्यात आला. मात्र, आता संबंधित ठेकेदार काम करत नसल्याने पथदीप देखभाल-दुरुस्तीसाठीही नवीन तीन ठेकेदार नियुक्तीसही मंजुरी देण्यात आली. (Dhule Old truck terminal damaged Fifty seven crores of new sanctioned)

महापालिकेची प्रशासकीय स्थायी समिती गुरुवारी सकाळी अकराला महापालिकेच्या (स्व.) दिलीप पायगुडे सभागृहात झाली. आयुक्त तथा प्रशासक अमिता दगडे-पाटील, अतिरिक्त आयुक्त करुणा डहाळे, नगरसचिव मनोज वाघ, उपायुक्त हेमंत निकम, उपायुक्त शोभा बाविस्कर, उपायुक्त डॉ. संगीता नांदूरकर यांच्यासह विभागप्रमुख, अधिकारी उपस्थित होते. सभेपुढे कार्योत्तर खर्चाचे विविध विषय होते, त्याला मंजुरी देण्यात आली. याशिवाय इतर काही नवीन कामे व प्रकल्पांनाही स्थायीने मंजुरी दिली.

नवीन ट्रक टर्मिनल

धुळे महापालिका हद्दीतील आरक्षण क्रमांक-१७७ येथे ट्रक टर्मिनल बांधण्याचा विषय समितीपुढे होता. धुळे महापालिकेच्या ८ नोव्हेंबर २०२३ चा ठराव व १५ मार्च २०२४ च्या शासन निर्णयानुसार या ट्रक टर्मिनलसाठी सहा कोटी ७३ लाख ३५ हजार ९८४ रुपये खर्चास आर्थिक व प्रशासकीय मान्यता मिळाली. त्यानुसार सहा कोटी ७३ लाख ३५ हजार ९८५ रुपये खर्चास तांत्रिक मंजुरी मिळाली.

त्यानंतर या कामासाठी निविदा मागविण्यात आल्या. यात सर्वेंद्र इन्फ्रास्ट्रक्चरची २० टक्के जादादराची, तर १.९० कमी दराने बोरसे ब्रदर्स इंजि. ॲन्ड कॉन्ट्रॅक्टर यांची निविदा प्राप्त झाली. बोरसे ब्रदर्सची कमी दराची निविदा असल्याने स्थायी समितीने ही निविदा मंजूर केली. त्यामुळे आता धुळ्यात सुमारे पावणेसात कोटी रुपये खर्चाचे नवीन ट्रक टर्मिनल उभे राहणार आहे. (latest marathi news)

Commissioner and Administrator Amita Dagde-Patil speaking in Municipal Administrative Standing Committee meeting. Additional Commissioner Karuna Dahale, Municipal Secretary Manoj Wagh and other officials are nearby.
Latest Maharashtra News Updates: दिवसभरातील महत्वाच्या बातम्या वाचा एका क्लिकवर

जुन्या टर्मिनलची दुरुस्ती

नवेकोरे ट्रक टर्मिनल बांधून त्याचा महापालिकेच्या उत्पन्नवाढीसाठी काहीही उपयोग न करणाऱ्या महापालिकेच्या यंत्रणेने आता नव्या ट्रक टर्मिनलचे काम मंजूर करतानाच या धूळखात पडलेल्या ट्रक टर्मिनलच्या दुरुस्तीसाठी प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना केल्या. त्यामुळे वापराअभावी दुरवस्थेकडे निघालेल्या या ट्रक टर्मिनलवरही नव्याने लाखो रुपये खर्च होतील.

पथदीपांसाठी तीन ठेकेदार

तत्कालीन मनपा सत्ताधाऱ्यांनी नवीन एलईडी पथदीप लावण्यासाठी १३ कोटी ६५ लाखांचा डीपीआर मंजूर केला. त्यातून २०२१ मध्ये वल्लभ इलेक्ट्रिकल्स (गुजरात) यांना हे काम देण्यात आले. संबंधित ठेकेदाराने नोव्हेंबर २०२३ पर्यंत शहरात एकूण १७ हजार ६७७ एलईडी पथदीप बसविले. नंतर बिल मिळत नसल्याने काम बंद केले. त्यामुळे शहरात पथदीपांच्या समस्या निर्माण होत आहेत.

यातून तोडगा काढण्यासाठी महापालिका प्रशासनाने आता शहराचे देवपूर (वलवाडी, भोकरसह), पूर्व भाग, पश्‍चिम भाग असे तीन भाग करून तीन ठेकेदार नियुक्त करण्याचा निर्णय घेतला. या तीन ठेकेदारांकडून आता पथदीप देखभाल-दुरुस्तीचे काम करण्यास स्थायी समितीने मंजुरी दिली. दरम्यान, वल्लभ इलेक्ट्रिकल्स यांच्याकडून उर्वरित काम करून घेतल्यानंतरच त्यांना सोडचिठ्ठी द्या, अशा सूचना आयुक्त श्रीमती दगडे-पाटील यांनी दिल्या.

Commissioner and Administrator Amita Dagde-Patil speaking in Municipal Administrative Standing Committee meeting. Additional Commissioner Karuna Dahale, Municipal Secretary Manoj Wagh and other officials are nearby.
Dhule News: झेडपी अध्यक्षा धरती देवरेंकडून अध्ययनस्तर चाचणीचा आढावा; आर्वी ZP शाळेसह आरोग्य केंद्राला अचानक भेट

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.