Dhule News : धुळे शहरात दीडशे इमारती धोकादायक! महापालिकेकडून संबंधितांना नोटिसा; काही इमारतींत नागरिकांचे वास्तव्य

Dhule News : या नोटिसांना संबंधित दाद देत नाहीत हा आजपर्यंतचा अनुभव आहे. त्यामुळे या वर्षीही यापेक्षा वेगळी स्थिती नसेल असे दिसते.
Dangerous, dilapidated buildings dot the city.
Dangerous, dilapidated buildings dot the city.esakal
Updated on

Dhule News : पावसाळ्यापूर्वी आपापल्या धोकादायक इमारती स्वतःहून काढून घ्या, इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट करून घ्या, अशा नोटिसा धुळे शहरातील १५३ धोकादायक इमारतधारकांना महापालिकेकडून बजावण्यात आल्या आहेत. महापालिकेकडून नोटिसा बजावण्याची औपचारिकता यानिमित्ताने यंदा पूर्ण झाली. मात्र, या नोटिसांना संबंधित दाद देत नाहीत हा आजपर्यंतचा अनुभव आहे. त्यामुळे या वर्षीही यापेक्षा वेगळी स्थिती नसेल असे दिसते. (Dhule buildings in city dangerous Notices)

पावसाळ्यापूर्वी दर वर्षीप्रमाणे महापालिका नगररचना विभागातर्फे शहरातील जीर्ण व धोकादायक इमारतींचे सर्वेक्षण केले. यात प्रथमदर्शनी १५३ धोकादायक इमारती शहरात आढळल्या. जुने धुळे, गल्ली नंबर १ ते ६ या गावठाण क्षेत्रासह इतर काही ठिकाणी या धोकादायक, जुन्या, जीर्ण इमारती आहेत.

यातील अनेक इमारतींमध्ये नागरिकांचे वास्तव्यदेखील आहे. दरम्यान, पावसाळ्यात या धोकादायक इमारती पडून दुर्घटना घडू नयेत, वित्त व जीवितहानी होऊ नये यासाठी महापालिकेतर्फे संबंधितांना नोटिसा बजावून आपापल्या इमारती स्वतःहून निष्कासित कराव्यात, इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट करून घ्यावे अशा प्रकारच्या नोटिसा बजावण्यात येतात.

यंदाही महापालिकेकडून अशा १५३ इमारतधारकांना या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. १५३ पैकी साधारण १८ इमारती रिकाम्या करून त्यांची संरचनात्मक दुरुस्ती करणे आवश्यक आहे. ६७ इमारती रिकाम्या न करता त्यांची रचनात्मक दुरुस्ती करता येणे शक्य आहे.

तर ६१ इमारतींची किरकोळ दुरुस्ती करण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले जाते. दहा ठिकाणी नव्याने बांधकाम किंवा दुरुस्ती होत आहे, तर चार इमारती अतिधोकादायक व राहण्यास अयोग्य असल्याचे सर्वेक्षण पथकाच्या निदर्शनास आले आहे. (latest marathi news)

Dangerous, dilapidated buildings dot the city.
Dhule Lok Sabha Election Vote Counting: मतमोजणी निरीक्षकांकडून मतमोजणी केंद्राची पाहणी! मतमोजणी तयारीचा आढावा

नोटिसांना केराची टोपली

नोटीस मिळाल्यावर धोकादायक इमारतीचे मालक अथवा तेथील रहिवासी मनपाच्या या नोटिसांकडे गांभीर्याने पाहत नाहीत. दर वर्षी अशा नोटिसा येतात अशी त्यांची मानसिकता दिसते. त्यामुळे धोकादायक इमारतींबाबत काहीही कार्यवाही होताना दिसत नाही. काही इमारती शंभर वर्षांपेक्षाही जुन्या असल्याचे सांगितले जाते. काही इमारती तर केव्हाही पडू शकतील असे चित्र दिसते. मात्र, अशा काही इमारतींमध्येही नागरिक बिनधास्त राहतात.

काही वादग्रस्त प्रकरणे

धोकादायक इमारती वर्षानुवर्षे खाली तशाच उभ्या दिसतात. एखादी नवीन व्यक्ती अशा इमारतीजवळ उभे राहण्यासह घाबरते. मात्र अशाही स्थितीत काही इमारतींमध्ये कुटुंबांचे वास्तव्यदेखील पाहायला मिळते. त्या खाली का होत नाहीत अथवा पाडल्या का जात नाहीत, असा प्रश्‍न पडतो.

यात काही ठिकाणी इमारतीच्या मालकीच्या प्रश्नावरून वाद असल्याचे व त्यामुळे अशा इमारती कुणी सहज सोडायला तयार नसल्याचे सांगितले जाते. अर्थात सर्वच इमारतींबाबत अशी स्थिती नाही. मात्र, अशा धोकादायक इमारतींमुळे केवळ त्या-त्या इमारतींमधील नागरिकांच्याच नव्हे तर इतरही नागरिकांच्या जिवाला धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Dangerous, dilapidated buildings dot the city.
Election Commission : ''सिस्टीममध्ये कुठलीही चूक होऊ शकत नाही'', मतमोजणीच्या तयारीबद्दल मुख्य आयुक्त राजीव कुमार म्हणाले...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.