Dhule News : मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात एकवर्षीय बालिकेचा बळी! धुळ्यातील संतप्त घटना; लचके तोडल्याने मृत्यू

Dhule News : रखवालदारीनिमित्त रहासे कुटुंब पेट्रोलपंपाजवळ एका पत्रटी शेडजवळ वास्तव्यास आहे. गुरुवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास बालिकेची आई व आजी शौचालयासाठी गेले अन...
stray dog ​​attack
stray dog ​​attackesakal
Updated on

Dhule News : शहरासह परिसरात मोकाट व भटक्या कुत्र्यांनी उच्छाद मांडला आहे. देवपूरमधील बोरसेनगरात गुरुवारी (ता. ६) पहाटे कुत्र्यांच्या टोळीने एकवर्षीय बालिकेवर हल्ला करीत तिचे लचके तोडले. त्यात बालिकेचा मृत्यू झाला. खुशी तेजाप रहासे (रा. रामपूर, ता. शहादा, जि. नंदुरबार, ह.मु. बोरसेनगर, मिलराज पेट्रोलपंपाजवळ, देवपूर, धुळे) असे तिचे नाव आहे. या संतापजनक घटनेमुळे नागरिकांनी महापालिकेवर रोष व्यक्त केला आहे. (one year old girl killed in attack by stray dogs)

रखवालदारीनिमित्त रहासे कुटुंब पेट्रोलपंपाजवळ एका पत्रटी शेडजवळ वास्तव्यास आहे. गुरुवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास बालिकेची आई व आजी शौचालयासाठी गेले. यादरम्यान पाच ते सहा कुत्र्यांच्या टोळीने शेडमध्ये झोपलेल्या खुशीवर हल्ला चढवीत तिचे लचके तोडले.

काही वेळाने बालिकेची आई व आजी परतले असता मुलगा राहुल बाहेर घाबरलेल्या अवस्थेत उभा दिसला, तर शेडमध्ये कुत्र्यांचे टोळके खुशीला चावा घेत असल्याचे दिसले. त्यांनी तेथून कुत्र्यांना हाकलत खुशीला जिल्हा रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान बालिकेचा सकाळी अकराच्या सुमारास मृत्यू झाला. याबाबत पश्चिम देवपूर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली. (latest marathi news)

stray dog ​​attack
Fraud Crime: तत्कालीन प्रशासकीय संचालकांसह १४ जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल

आठशे जणांना चावा

दरम्यान, शहरात महिन्याला ७०० ते ८०० जणांना मोकाट व भटके कुत्रे चावा घेतात. यात लहान बालकांची संख्या सर्वाधिक असते. जिल्हा सर्वोपचार रुग्णालयात गेल्या मेमध्ये श्वानदंशाची लस घेण्यासाठी ६०० रुग्ण आले होते. यात नव्याने श्वानदंश झालेल्या २७२ रुग्णांचा समावेश होता.

तसेच जिल्हा ३८० जण श्वानदंशानंतर उपचारासाठी आले होते. महापालिकेच्या दवाखान्यात १७० हून अधिक जणांनी रेबीजची लस घेतल्याची नोंद झाली. शहरातील रुग्णांची ही संख्या लक्षात घेता कुत्र्यांची दहशत चव्हाट्यावर येते. त्यामुळे महापालिकेने मोकाट कुत्र्यांचे निर्बीजीकरण करून त्यांचा बंदोबस्त करावा, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

stray dog ​​attack
Buldhana Crime : शेतीच्या वादातून पुतण्याने केला काकाचा खून

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.