कापडणे : पावसाळी कांद्याची लागवड साधारणतः जुलैच्या शेवटच्या आठवड्यापासून होत असते. ऑगस्टमध्ये पूर्णत्वास येते. या वर्षी सततच्या पावसाने कांदा रोपांचे मोठे नुकसान झाले. पेरलेले कांदा बियाणे वाहून गेले. तर अविरत पावसामुळे ओल्या मातीचा वाफसा झाला नाही. वाफे तयार करता आले नाहीत. परिणामी कांद्याची लागवड तुरळच स्वरूपात अन् उशिरा होत गेली. परिणामी दिवाळीनंतर नवा कांदा बाजारात दाखल होणे अपेक्षित असते. (onion now in market in December Onion plants were damaged due to heavy rains )