Dhule News : दोंडाईचात आरोग्य यंत्रणा कोलमडली; उपजिल्हा रुग्णालयाचा कारभार दोनच डॉक्टरांवर

Dhule News : उपजिल्हा रुग्णालयातील कारभार दोनच डॉक्टरांवर आला आहे. आरोग्य यंत्रणा कोलमडली आहे.
Upazila Hospital Building.
Upazila Hospital Building.esakal
Updated on

दोंडाईचा : येथील उपजिल्हा रुग्णालयातील कारभार दोनच डॉक्टरांवर आला आहे. आरोग्य यंत्रणा कोलमडली आहे. आपत्कालीन रुग्ण व अत्यावश्यक सेवेसाठी मंजूर पदांच्या संख्येनुसार आरोग्यसेवा मिळावी, अशी मागणी शहर परिसरातून केली जात आहे. दरम्यान, उपजिल्हा रुग्णालयात सात वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे मंजूर आहेत. त्यात सहा पदे भरली आहेत, तर एक पद रिक्त आहे. (Dhule Only 2 doctors are in charge of Upazila Hospital in Dondaicha health system has collapsed)

दोन वैद्यकीय अधिकारी प्रशासकीय प्रशिक्षणाला, तर दोन कंत्राटी वैद्यकीय अधिकाऱ्यांची मुदत संपल्याने कार्यमुक्त झाले आहेत. त्यामुळे एक वैद्यकीय अधीक्षक व एक वैद्यकीय अधिकारी या दोनच डॉक्टरांवर कारभार पाहण्याची वेळ आली आहे. आरोग्यसेवेवर होणारा परिणाम टाळण्यासाठी जिल्हा शल्यचिकित्सकांनी नवीन आवश्यक दोन डॉक्टरांची येथे नेमणूक करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

उपजिल्हा रुग्णालयात सद्यःस्थितीत तीनशेपेक्षा जास्त रुग्णांवर उपचार सेवा दिली जाते. ओपीडीची संख्या वाढली आहे. अत्यावश्यक सेवा देण्यासाठी पुरेशा प्रमाणात डॉक्टर आवश्यक आहेत. कार्यरत सहा डॉक्टरांपैकी डॉ. भूषण काटे यांना प्रतिनियुक्तीवर शिंदखेडा येथे पाठविले आहे.

दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांना महिन्याभराच्या प्रशिणासाठी यशदा, पुणे येथे पाठविण्यात आले आहे. दोन कंत्राटी वैद्यकीय अधिकाऱ्यांची मुदत संपल्याने ते कार्यमुक्त झाले आहेत. त्यामुळे सध्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. भरत कुलकर्णी व वैद्यकीय अधिकारी डॉ. तेजस जैन या दोन डॉक्टरांवर आरोग्यसेवेची मदार आहे. (latest marathi news)

Upazila Hospital Building.
Dhule Milk Rate Hike : चाराटंचाईमुळे दुधाची दरवाढ! म्हशीचे 70, तर गायीचे 55 रुपये लिटरने विक्री

शहर बाजारपेठेचे गाव आहे. जवळपास ५० गावांचा संपर्क येतो. गावावरून गुजरात, मध्य प्रदेशकडे जाणारे महामार्ग आहेत. रेल्वेस्थानक असल्याने लांब पल्ल्याच्या गाड्या येथे थांबतात. हजारो शाळा-महाविद्यालयांचे विद्यार्थी येथे येत असतात. त्यामुळे शहरात नेहमी वर्दळ असते. अशा वेळी अनेक घटना घडत असतात. वैद्यकीय सेवा कोलमडून पडू नये यासाठी आवश्यक सेवांसाठी वैद्यकीय अधिकारी वेळेवर उपलब्ध असावेत, अशी मागणी केली जात आहे.

डॉक्टरांची नेमणूक करावी

सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याचे चित्र आहे. १५ एप्रिलपासून बीसीजी लसीकरण मोहीम हाती घेण्यात येणार आहे. त्याबाबतच्या नियोजनासाठी कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त ताण निर्माण झाला आहे. वेळेवर लक्ष वेधून जिल्हा शल्यचिकित्सकांनी वस्तुस्थिती पाहून नवीन किमान दोन डॉक्टरांची नेमणूक करावी. अस्थायी स्वरूपात कंत्राटी पद्धतीने मुदत संपलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना त्वरित नेमणुका करून कार्यरत करावे, अशी मागणी केली जात आहे.

"सध्या दोन वैद्यकीय अधिकारी वैद्यकीय सेवा पाहत आहेत. मी स्वतः रुग्णांची तपासणी करत आहे. कार्यरत सहा डॉक्टरांपैकी एक जण प्रतिनियुक्तीवर आहे. दोन जण प्रशिक्षणासाठी पुणे येथे, तर दोन कंत्राटी पद्धतीने अस्थायी स्वरूपातील डॉक्टरांची मुदत संपली आहे. आवश्यक सेवांसाठी दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांची मागणी वरिष्ठ पातळीवर केली आहे." -डॉ. भरत कुलकर्णी, वैद्यकीय अधीक्षक, उपजिल्हा रुग्णालय, दोंडाईचा

Upazila Hospital Building.
Dhule News : शिंदखेड्यात फक्त 921 हेक्टरवरील शेतकऱ्यांना बागायती दुष्काळी मदत

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.