Dhule News : रेशनमालाच्या सुविधांपासून जनता त्रस्त! अपर तहसीलदार मीटिंगांमध्ये व्यस्त, न्याय मागावा कुठे?

Latest Dhule News : बहुसंख्य ग्रामस्थ रेशनमाल मिळण्यापासून वंचित असून, तहसीलदारांकडे न्याय मिळेल म्हणून जातात, तर न्याय देणारे दंडाधिकारीच कर्मचाऱ्यांच्या मीटिंगांमध्ये व्यस्त आहेत.
Crowd of villagers who came for work at Upper Tehsil office in Dondaicha.
Crowd of villagers who came for work at Upper Tehsil office in Dondaicha.esakal
Updated on

विखरण : दोंडाईचा अपर तहसीलदार कार्यालयांतर्गत ४३ गावे असून, शिधापत्रिका ऑनलाइन करण्यासाठी एकच ऑपरेटर कर्मचारी असल्याने कामे वेळेवर होत नाही. त्यातही त्या कर्मचाऱ्याला दोन दिवस शिंदखेडा तहसील कार्यालयात जावे लागते. शिधापत्रिका ऑनलाइन करूनही रेशनमाल विक्रेताकडे त्या कार्डाचा समावेश झाला नसल्याचे सांगण्यात येते.

बहुसंख्य ग्रामस्थ रेशनमाल मिळण्यापासून वंचित असून, तहसीलदारांकडे न्याय मिळेल म्हणून जातात, तर न्याय देणारे दंडाधिकारीच कर्मचाऱ्यांच्या मीटिंगांमध्ये व्यस्त आहेत. त्यामुळे जनता त्रस्त होत असून, त्यांनी न्याय तरी कुठे मागावा, असावा असा प्रश्न उपस्थित होत आहे. (People suffering from ration facilities)

दोंडाईचा अपर तहसीलदार कार्यालयांतर्गत शिंदखेडा तालुक्यातील पस्तीस सज्जामधून ४३ गावांतील जनतेचा कोणत्याना कोणत्या कामानिमित्त दैनंदिन संपर्क होतो. येथे शिधापत्रिका ऑनलाइन करून घ्यायची असेल तर एकच कर्मचारी असून, त्यांच्याकडे शिंदखेडा कार्यालयाचाही पदभार असल्यामुळे दोन दिवस तेथे जावे लागते व शिल्लक चार दिवसांत कधी मिटिंगला हजेरी द्यावी लागते.

कधी सुटी, कधी सरोवर डाउन अशा समस्यांमुळे रेशनकार्ड ऑनलाइन करून घेण्यासाठीसुद्धा आठवडाभर फिरावे लागते. एवढे करूनही आनंदाचा शिधा घेण्यासाठी ती व्यक्ती गेली, तर त्या कार्डाची नोंद त्या दुकानदाराकडे झालेली नसते. (latest marathi news)

Crowd of villagers who came for work at Upper Tehsil office in Dondaicha.
"45 दिवस झोप नाही, जेवणही नाही...", लोन विभागातील कर्मचाऱ्यानं कामाच्या दबावामुळे संपवलं जीवन, आई-वडिलांना शेवटचं पत्र

त्यामुळे चक्रा मारूनही रेशनमाल मिळत नसल्याने बहुसंख्य गावातील ग्रामस्थ त्रस्त होत असून, पुन्हा अपर तहसीलदारांकडे समस्या मांडायला लोक जातात, तर कार्यालयाबाहेरील चौकीदार म्हणतो मीटिंग चालू आहे. म्हणजे न्याय देणारे तहसीलदार मीटिंग मध्ये व्यस्त, तर त्रस्त जनेतेने न्याय तरी कुठे मागावा, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Crowd of villagers who came for work at Upper Tehsil office in Dondaicha.
Dhule News : L&T ‘आउट', जयंतीसुपरला ‘कॉन्ट्रॅक्ट’! मलनिस्सारण टप्पा दोनची 688 कोटींची निविदा मनपातर्फे मंजूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.