Dhule News : 50 लाखांची कीटकनाशके खरेदी होणार! महापालिकेकडून कार्यवाही; 2 लाख कार्योत्तर खर्च मंजूर

Dhule News : निविदा प्रक्रियेअंती ही खरेदी होईल. त्यामुळे ऑगस्टमध्येच हे अळीनाशके/कीटकनाशके महापालिकेला उपलब्ध होतील.
Dhule municipal Corporation
Dhule municipal Corporationesakal
Updated on

Dhule News : कीटकजन्य आजारांना प्रतिबंध घालणे, नियंत्रण राखणे यासाठी महापालिकेच्या माध्यमातून अळीनाशके/कीटकनाशक वापरली जातात. अर्थात ॲबेटिंग, फवारणी, धुरळणीसाठी लागणारा हा औषधसाठा खरेदी करण्यासाठी महापालिकेच्या प्रशासकीय स्थायी समितीने नुकतीच आर्थिक व प्रशासकीय मंजुरी दिली.

निविदा प्रक्रियेअंती ही खरेदी होईल. त्यामुळे ऑगस्टमध्येच हे अळीनाशके/कीटकनाशके महापालिकेला उपलब्ध होतील. दरम्यान, सद्यःस्थितीत शिल्लक साठ्यातून हे काम सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. (Dhule Pesticides worth 50 lakhs will be purchased)

धुळे महापालिकेच्या नागरी हिवताप योजनेंतर्गत २०२४-२५ साठी अळीनाशके/कीटकनाशके खरेदीसाठी महापालिकेच्या अंदाजपत्रकात ५० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. ही अळीनाशके/कीटकनाशकांचे शासकीय दर करार उपलब्ध नाहीत. त्यामुळे उत्पादक कंपनीच्या एमआरपी दराप्रमाणे धुळे मनपा यांच्या मागणी रिपोर्टप्रमाणे खरेदीसाठी साधारण ५० लाख ९५ हजार रुपये खर्च अपेक्षित आहे.

या खर्चासह स्पर्धात्मक दरांचा फायदा मिळविण्यासाठी ई-निविदा प्रसिद्ध करण्यास ११ जुलैला झालेल्या महापालिकेच्या प्रशासकीय स्थायी समितीने मंजुरी दिली. दरम्यान, ई-निविदा प्रसिद्ध करणे, निविदा प्राप्त होणे आदी प्रक्रियेसाठी साधारण ऑगस्ट उजाडेल.

त्यामुळे सुमारे ५० लाख रुपयांची ही अळीनाशके/कीटकनाशके ऑगस्टमध्येच उपलब्ध होतील. दरम्यान, सद्यःस्थितीत शिल्लक असलेल्या कीटकनाशके/अळीनाशकांतूनच धुळे शहरात उपाययोजना सुरू आहेत. यापूर्वी शासनाकडून कीटकनाशके उपलब्ध होत होती. मात्र, आता ती उपलब्ध होत नसल्याने महापालिकेला आपल्या स्तरावरून याची खरेदी करावी लागत आहे. (latest marathi news)

Dhule municipal Corporation
Dhule News : जुने ट्रक टर्मिनल ‘धूळखात’! पावणेसात कोटींचे ‘नवे’ मंजूर; पथदीप देखभाल-दुरुस्तीसाठीही नवीन तीन ठेकेदार

अळी/कीटकनाशके व खर्च असा

टेमोफॉस (ॲबेट)- ५० टक्के ईसी...१००० लिटर...१६ लाख ९० हजार

बीटीआय पावडर ५ एएस...........२००० किलो... २९ लाख ८० हजार

प्रायरेथम २ टक्के अर्क............... १०० लिटर... दोन लाख ६० हजार

एमएलओ (ऑइल)....१००० हजार लिटर... एक लाख ६५ हजार रुपये

दोन लाख खर्चास मंजुरी

दरम्यान, जून-२०२४ मध्ये फवारणीसाठी महापालिकेने अर्जदार सी. के. महाजन यांच्याकडून ऑपरेटरसह तीन मिनी ट्रॅक्टर भाडेतत्त्वावर लावले. आचारसंहितेमुळे विनानिविदा हे काम करण्यात आले. या कामासाठी प्रतिट्रॅक्टर आठ हजार ८३२ रुपये याप्रमाणे ठेकेदाराने एकूण दोन लाख तीन हजार ९०४ रुपये बिल काढले. या बिलास गुरुवारी (ता. १८) मनपा प्रशासकीय स्थायी समितीने कार्योत्तर मंजुरी दिली.

Dhule municipal Corporation
Dhule News: झेडपी अध्यक्षा धरती देवरेंकडून अध्ययनस्तर चाचणीचा आढावा; आर्वी ZP शाळेसह आरोग्य केंद्राला अचानक भेट

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.