Dhule News : पिंपळनेरकरांचा संताप; पाण्याच्या निचऱ्यासाठी गटारी, पण सुरक्षाफलकच नाहीत

Dhule News : पिंपळनेर येथील राष्ट्रीय महामार्गाच्या पाणी निचरा होण्यासाठी रस्त्यांच्या दोन्ही बाजूला खोदलेल्या गटारीमध्ये पावसाचे पाणी भरल्याने अंदाज येत नसल्याने गटारीत पडून अनेक वाहनांचे मोठे नुकसान.
Damage to four-wheelers due to lack of safety boards or barricades in gutters.
Damage to four-wheelers due to lack of safety boards or barricades in gutters.esakal
Updated on

Dhule News : येथील राष्ट्रीय महामार्गाच्या पाणी निचरा होण्यासाठी रस्त्यांच्या दोन्ही बाजूला खोदलेल्या गटारीमध्ये पावसाचे पाणी भरल्याने अंदाज येत नसल्याने गटारीत पडून अनेक वाहनांचे मोठे नुकसान, तर खड्ड्यांमध्ये पडून नागरिकांचे शारीरिक नुकसान होत असल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट सुरू आहे. शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर मोठमोठे खड्डे पडले होते. (Pimpalner Gutter for drainage water but no safety boards)

नागरिकांनी तक्रार केल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर काम करण्यात आले. या रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये मातीमिश्रित मुरूम व खडी टाकून खड्डे बुजविण्यात आले. यामुळे सामोडे चौफुली ते जेटी पॉइंटपर्यंत राष्ट्रीय महामार्गाला खडीकरणाचे स्वरूप आले आहे. पावसाळ्याचे पाणी निचरा होण्यासाठी रस्त्याच्या दोन्ही बाजूला गटारी खोदण्यात आल्या.

शहरात पावसाने चांगला जोर धरला असून, या रस्त्यावरील पाणी दोन्ही बाजूच्या गटारींमध्ये पूर्णपणे भरून जात आहे. गटारींना बॅरिकेड किंवा सुरक्षा न केल्यामुळे या गटारींचा वाहनधारकांना व रस्त्यावरून फिरणाऱ्या नागरिकांना अंदाज येत नसल्याने गटारीमध्ये दुचाकी व चारचाकी वाहने जाऊन त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.

नागरिक या गटारीच्या खड्ड्यामध्ये पडून त्यांच्या हातापायांना लागून शारीरिक नुकसान होत आहे. यामुळे ‘नागरिकांचा जीव जाये व प्रशासनाचा खेळ होये’ अशी म्हण पिंपळनेर शहरात प्रचलित होऊ लागली आहे. (latest marathi news)

Damage to four-wheelers due to lack of safety boards or barricades in gutters.
Dhule News : हरणमाळ, नकाणे तलाव जम्बो कालव्याद्वारे भरा; माजी आमदार राजवर्धन कदमबांडे यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

आर्थिक, शारीरिक नुकसान

आधीच या रस्त्यासाठी नागरिकांची डोकेदुखी ठरली असून, रस्त्यावरील धुळीचा त्रास, खड्ड्यांचा त्रास आता यानंतर वाहने गटारीत जात असल्याने मोठ्या प्रमाणात वाहनांचे आर्थिक व शारीरिक नुकसान होत असल्याने संताप व्यक्त होत आहे.

छोट्या-मोठ्या अपघातांचा मोठा अपघात होण्याआधीच संबंधित प्रशासनाने वेळीच दखल घेऊन उपाययोजना करावी, अन्यथा एखाद्या नागरिकाचा यामुळे जीव धोक्यात येऊ शकतो, अशी भीती नागरिकांमधून व्यक्त करत सोशल मीडियावरून नागरिकांमध्ये संबंधित प्रशासन, लोकप्रतिनिधी यांच्याविरुद्ध संताप व्यक्त करण्यात येत आहे.

रस्त्याचे काम न्यायप्रविष्ट

रस्त्याचे काम न्यायप्रविष्ट असल्याने न्यायालयाचा आदेश होईपर्यंत आहे त्या स्थितीत तरी पूर्ण रस्ता संबंधित प्रशासन व लोकप्रतिनिधींनी लक्ष घालून लवकरात लवकर डांबरीकरण द्यावा. खोदलेल्या गटारी झाकण्यात याव्या, अशी मागणी नागरिकांमधून होताना दिसून येत आहे.

Damage to four-wheelers due to lack of safety boards or barricades in gutters.
Dhule News : 6 आपत्कालीन फायर बाइकचे धुळ्यात वितरण; पालकमंत्री महाजन यांच्या हस्ते लोकार्पण

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.