कापडणे : जिल्ह्यात ऑगस्टपर्यंतच्या सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून सर्वच नदी-नाले प्रवाहीत झाले आहेत. जिल्ह्यातील सर्वच पर्यटनस्थळांनी हिरवाईची चादर पांघरली आहे. लहान-मोठे धबधबे पर्यटकांना आकर्षित करीत आहेत. लळींग कुरण, किल्ला, धरणे, तलाव, प्रकल्प बघण्यासाठी अन् फिरण्यासाठी पर्यटकांची गर्दी वाढत आहे. (places in district full of tourists attraction of waterfalls forts)