Police personnel while returning the mobile to the owner.
Police personnel while returning the mobile to the owner.esakal

Dhule News : महागडे मोबाईल मालकाला परत; महामार्गावर गवसल्यानंतर खाकी वर्दीतील प्रामाणिकपणा

Dhule : खाकी वर्दीतील प्रामाणिकपणा एका महागड्या मोबाईल परतीवरून अधोरेखित झाला.
Published on

Dhule News : खाकी वर्दीतील प्रामाणिकपणा एका महागड्या मोबाईल परतीवरून अधोरेखित झाला. महामार्गावर गस्तीवर असताना पोलिस शिपाई चेतन माळी यांना दोन महागडे मोबाईल सापडले. त्यांनी मूळ मालकाचा शोध घेत त्यांना दोघे मोबाईल परत केले. मोबाईल मालकांनी पोलिसांचे आभार मानत कौतुकही केले. ( police find mobile phone and return to owner )

शिंदखेडा पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक प्रशांत गोरावडे, पोलिस शिपाई भारत मोहिते, चालक पोलिस शिपाई चेतन माळी आणि पोलिसमित्र चेतन पाटील गस्तीवर होते. शिरपूर टोलनाक्याजवळ महामार्गावर पोलिस शिपाई चेतन माळी यांना ॲपल आणि रियल मी कंपनीचा, असे एकूण सव्वादोन लाख किमतीचे दोन मोबाईल सापडले.

Police personnel while returning the mobile to the owner.
Dhule Crime News : धुळ्यात कोरडा भांग तस्करांचा पर्दाफाश; एलसीबीची कारवाई

ते सुस्थितीत होते. पोलिस शिपाई माळी व सहकाऱ्यांनी मूळ मालकाचा शोध घेतला. त्यानुसार मालक प्रथमेश संजय अहिरे (रा. नकाणे रोड, धुळे) यांना त्यांचे हरवलेले दोघेही मोबाईल परत केले. शिंदखेडा पोलिस ठाण्याचे निरीक्षक दीपक पाटील, कर्मचारी व नागरिकांनी चेतन माळी, भारत मोहिते व पोलिसमित्र चेतन पाटील यांचे कौतुक केले.

Police personnel while returning the mobile to the owner.
Dhule News : धुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यावर चिंतेचे ढग! साक्री, शिरपूर व शिंदखेड्यात पावसाची प्रतीक्षा कायम

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com